मतदारांच्या गरजा ओळखून विकास करतो तोच खरा आमदार

मगोप नेते प्रवीण आर्लेकर यांचं प्रतिपादन

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः सामान्य जनतेला काय हवं यावर त्या तालुक्याचा, त्या मतदारसंघाचा विकास अवलंबून असतो. आज पेडणे मतदारसंघात विकास होत आहे, स्थानिक लोकांना हवा तसा नव्हे, तर ठराविक राजकीय व्यक्तींना, त्यांच्या कार्यकर्त्यांना हवा तसा विकास होतोय. म्हणूनच आज संपूर्ण मतदारसंघात प्रत्येक प्रकल्पाला विरोध चालू आहे. मतदारांच्या गरजा ओळखून विकास करतो तोच खरा आमदार असतो, असं प्रतिपादन मगोप नेते प्रवीण आर्लेकरांनी केलं. तळर्ण गावातील नागरिक ज्ञानेश्वर नाईक यांना आर्लेकरांनी व्हीलचेअर प्रदान केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत मगो पक्षाचे केंद्रीय सदस्य सुदीप कोरगावकर, युवा नेते सुबोध महाले, अशोक धाऊसकर, तसंच या भागातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचाः अण्णा नाईकांच्या वाड्यावर पुन्हा ‘रात्रीस खेळ चाले’

आर्लेकर करत आहेत तो खरा विकास

आमदाराने मतदारांच्या गरजा ओळखून विकास साधला पाहिजे. आजपर्यंत जर विकास झाला असता, तर मतदार रस्त्यावर आले नसते. ‘मोपा’सारख्या प्रकल्पाला विरोध का होत आहे? मोपातील रस्ता जमीन भूसंपादन प्रक्रियेस विद्रोध का होतोय? पेडण्यात येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाला पुन्हा पुन्हा विरोध का? याचा अभ्यास विद्यमान आमदाराने करणं गरजेचं आहे. मगोप नेते आर्लेकरांनी गेल्या वर्षभरात अनेक कार्यक्रम आखून मतदारांना काय पाहिजे त्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न केलाय. त्यात कडधान्य वाटप, ओसीकॅन वाटप, स्टीमर वाटप, गरजूंना घर, व्हीलचेअर प्रदान, गरजूंना तांत्रिक पाय, मेडिकल सवलती, शैक्षणिक संस्थाना पाठबळ हा खरा मतदारांचा विकास होय. विकासाच्या नावाखाली मतदारांना लुबाडणं, जमीनी हडप करणं, शेतकऱ्यांना नाहक त्रास देणं या गोष्टीतून सामान्य जनता सुखी राहू शकत नाही, असे उद्गार सुबोध महालेंनी काढले.

हेही वाचाः अहाना सांगुईला विद्यार्थी विज्ञान मंथन स्पर्धेत दुसरा क्रमांक प्राप्त

तळर्ण गावचे नागरिक ज्ञानेश्वर नाईक यांना व्हीलचेअर प्रदान केल्याबद्दल उपस्थितांनी आर्लेकरांचे आभार मानले. तसंच या पुढे त्यांचा हातून अशीच समाजसेवा घडो, अशी सर्वांनी प्रार्थना केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!