गोव्यात विवाहानंतरच्या हिंसेचे प्रमाण आठ टक्के

१.६ टक्के गरोदर महिला ठरतात शारीरिक हिंसेच्या बळी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: सध्या चर्चेत असलेल्या मूल पळविण्याच्या प्रकरणाला घरगुती हिंसा आणि ‘मुलगा हवा’ असा कुटुंबियांचा असलेला दबाव अशी एक किनार असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आलं आहे. विवाहानंतर अनेक महिलांना अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. गोव्यात २०१४-१५ साली राष्ट्रीय कुटुंब आरोग्यासंबंधी चौथै सर्वेक्षण झालं होतं. त्यात गोव्यात १३ टक्के महिलांना विवाहानंतरच्या हिंसेला सामोरं जावं लागतं, असं म्हटलं होतं. त्यानंतर पाचवं सर्वेक्षण डिसेंबर २०२० मध्ये प्रसिद्ध झालं. त्यात गोव्यातील विवाहानंतरच्या हिंसेत घट (आठ टक्के) झाल्याचं दिसून आलं. या हिंसा कमी झाल्या तरी महिला आयोग तसंच महिला पोलीस स्थानकात येणाऱ्या तक्रारी पाहता गोव्यात कितीतरी महिलांना अशा छळाला सामोरं जावं लागतं, असं स्पष्ट होतं.

हेही वाचाः गोव्यात कुठे मिळेल नोकरी? इथे आहेत नोकरीच्या संधी!

पाचव्या कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात १५ ते ४९ वयोगटातील ९३ टक्के महिला साक्षर असल्याची नोंद आहे. तसंच पुरुषांच्या साक्षरतेचं प्रमाण ९६.३ टक्के असल्याचं म्हटलं आहे. साक्षरतेचं प्रमाण मोठं असूनही विवाहानंतरच्या हिंसा मोठ्या प्रमाणात होतात. गरोदरपणात शारीरिक हिंसेला बळी पडलेल्या महिलांचा आकडाही १.६ टक्के इतका आहे. मूल पळविण्याच्या प्रकरणाला अशाच हिंसेची किनार होती हे तपासात समोर आले आहे.

हेही वाचाः 20 दिवसांत फक्त 3 टॅक्सींना डिजिटल मीटर बसवले!

३० ऑगस्ट २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून पाचवं कुटुंब आरोग्य सर्वेक्षण झालं होतं. गोव्यातील १,८५६ घरांना भेटी देऊन २,०३० महिला तसंच ३१३ पुरुषांकडून माहिती मिळवून हा अहवाल तयार केला होता.

हेही वाचाः कॉलेजची अंतिम परीक्षा 9 जुलैपासून, परीपत्रक जारी

कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवालातील नोंदी

* महिला साक्षरतेचे प्रमाण गोव्यातील ग्रामीण भागात ९३.४ तर शहरी क्षेत्रात ९२.६ टक्के आहे.
* १५ ते ४९ वयोगटात पुरुषांचे ग्रामीण भागातील साक्षरतेचं प्रमाण ९८.५ तर शहरी भागातील प्रमाण ९४.९ टक्के आहे.
* १८ ते ४९ वयोगटातील ८ टक्के महिला वैवाहिक काळात तसंच १८ ते २९ या गटातील ४.६ टक्के महिला लैंगिक हिंसेच्या शिकार झाल्या आहेत.
* १.६ टक्के महिलांना गरोदर असलेल्या काळात शारीरिक हिंसा सोसावी लागली.       

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!