पावसाची उसंत, तापमान वाढले

पुढील काही दिवस तुरळक पावसाची शक्यता

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यात सध्या पावसाला पोषक असलेली स्थिती दूर झाल्याने पुढील काही दिवस तुरळक पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. गुरुवारी पावसाने उसंत घेतली होती. राज्यातील काही भागातच तुरळक पावसाची हजेरी होती.

सध्या मान्सूनसाठी तेवढं पोषक वातावरण नाही

सध्या मान्सूनसाठी तेवढं पोषक वातावरण नाही, गणेश चतुर्थीत सलग ५ दिवस हजेरी लावल्यानंतर आता पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. राज्यासाठी पावसामुळे सतर्कतेचा इशारा सध्या नाही. अरबी समुद्रातून जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं कळवलं आहे.

१९ तारखेनंतर पुन्हा पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता

पावसाने गुरुवारी उसंत घेतल्यानंतर तापमानातही वाढ झाली होती. १९ तारखेनंतर पुन्हा पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!