द पर्पल फेस्ट: गोव्यातील पहिला सर्वसमावेशक महोत्सव…

पणजी येथे 6 ते 8 जानेवारी या कालावधीत 'द पर्पल फेस्ट' आयोजित

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोवा राज्य दिव्यांगजन आयोग, समाज कल्याण संचालनालय आणि गोवा मनोरंजन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 6 जानेवारी ते 8 जानेवारी 2023 या कालावधीत पणजी येथे ‘द पर्पल फेस्ट’ आयोजित करण्यात आले असून या प्रकारचा सर्वसमावेशक महोत्सव पहिल्यांदाच राज्यात होणार असल्याची माहिती बुधवारी समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
हेही वाचाःसावधान! बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट

पत्रकार परिषदेस अधिकारी उपस्थित

पर्वरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सुभाषचंद्र, आयएएस, सचिव, समाज कल्याण संचालनालय, संध्या कामत, संचालक, समाज कल्याण संचालनालय, गुरुप्रसाद पावसकर, राज्य दिव्यांगजन आयुक्त आणि ताहा हाझिक, सचिव राज्य दिव्यांगजन आयोग उपस्थित होते.
हेही वाचाःJammu & Kashmir: कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार…

महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्र आयोजीत

‘द पर्पल फेस्ट’ हा तीन दिवसांचा सर्वसमावेशक कार्यक्रम असून यात सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य प्रदर्शन, क्रीडासंबंधित कार्यक्रम, एक्सपीरियंस झोन आणि इनोव्हेशन मेला यांचा समावेश आहे. याशिवाय विविध स्पर्धा, मेगा कार रॅली आणि सर्वसमावेशक शिक्षण, रोजगार, पर्यटन यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्र आयोजीत करण्यात आल्याची माहिती फळदेसाई यांनी दिली.
हेही वाचाःकामुर्ली येथे घराला आग, दोन लाखांची हानी…

या महोत्सवाव्दारे लोकांपर्यंत एक संदेश पोहोचवण्याचा उद्देश

‘द पर्पल फेस्ट’ या महोत्सवाव्दारे दिव्यांगत्व हा अडथळा नसून याउलट दिव्यांगत्वाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन हा सर्वात मोठा अडथळा आहे, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे, असे फळदेसाई यांनी सांगितले.
हेही वाचाःPFI Banned : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि संलग्न संघटनांच्या मुसक्या आवळल्या…

दिव्यांगजन समाजाचाच एक भाग

फळदेसाई पुढे म्हणाले, “दिव्यांग लोकांसाठी सर्वात मोठा अडथळा हा आहे की समाज त्यांना कसा अक्षम करतो. दिव्यांग लोक दररोज अनेक आव्हानांना सामोरे जातात. सर्वसमावेशक समाज बनवण्यासाठी आपल्याला आपला दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वात आधी दिव्यांगत्वाकडे समाजाने निर्माण केलेले मनोवृत्ती, शारीरिक, सिस्टमिक, कम्युनिकेशन आणि तांत्रिक अडथळे म्हणून पाहिले पाहिजे. दिव्यांगजन देखील आपण राहत असलेल्या समाजाचा भाग असून त्यांनाही मुख्यप्रवाहात आणणे आपली जबाबदारी आहे”.
हेही वाचाःAccident | ट्रॅक्टर तलावात उलटून झालेल्या अपघातात आठ महिलांसह दोन मुलांचा मृत्यू …

पर्पल का?

अलीकडच्या काळात पर्पल रंग दिव्यांगजनांच्या चळवळीचा प्रतीक बनला आहे. दिव्यांगजनांचे कार्यबल आणि समाजात त्यांनी दिलेला योगदान, सर्वांना कळावा यासाठी ही चळवळ जागतिक पातळीवर सुरू झाली आहे. त्यामुळे या महोत्सवाचे नाव ‘द पर्पल फेस्ट’ म्हणून ठेवण्यात आले आहे.
हेही वाचाःCrime | अधिकाऱ्याच्या डोक्याला बंदूक लावून घेतला रस्ता बांधून…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!