फोंड्यातील प्रसिद्ध साफा मशिदीची संरक्षक भिंत कोसळली

भिंत कोसळल्यामुळे ऐतिहासिक साफा मशिदीला धोका

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा: मुसळधार पावसाचा फटका शापूर-फोंड्यातील साफा मशिदीला बसला. या मशिदीच्या जवळ असलेल्या तलावाच्या कठड्याची एक बाजू अचानक गुरुवारी संध्याकाळी कोसळली. मशिदीच्या लगतचं हे बांधकाम कोसळल्यानं मशिदीला धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचाः पुराचा धोका वाढला! अंजुणे धरणाचे चारही दरवाजे उघडले

पुरातत्व विभागाने त्वरित लक्ष देण्याची गरज

बांदोड्याचे सरपंच राजेश नाईक म्हणाले की, या घटनेकडे पुरातत्व विभागाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. मशिद ही संरक्षक भिंतीच्या काठावर उभी आहे. तत्काळ लक्ष न दिल्यास पर्यटकांनाही याचा धोका निर्माण होऊ शकतो. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेनं ही मशिद सांभाळली असल्यामुळे विभागाने त्वरित या प्रकरणाची तपासणी केली पाहिजे.

हेही वाचाः पेडण्यात घरात शिरलं पाणी; शेतीला आलं नदीचं स्वरूप

ऐतिहासिक वारसास्थळ

सरपंचांनी झालेल्या नुकसानाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि सांगितलं, की प्रत्येक वर्षी पुरातन खात्याकडून देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात. बांदोडा पंचायत हद्दीतील फोंडा शहराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शापूर येथे इस्लामिक शासक आदिल शहा यांनी फोंडामधील ही ऐतिहासिक आणि वारसा स्थळ असलेली मशिद बांधली आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | बांदा परिसरात पावसामुळे हाहाकार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!