विज्ञान आणि तंत्रज्ञानातील विकासावर देशाची प्रगती ठरते !

डॉ. सुहास पेडणेकर : 5000 प्रतिनिधींचा सहभाग

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सव – २०२२ च्या सातव्या आवृत्तीचा गुरुवारी समारोप झाला. या तीन दिवसीय महोत्सवात ५००० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी समारोप समारंभात आयोजकांची प्रशंसा केली.
हेही वाचाःमहिलांना स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने गोवा सरकारचं पाऊल!

मान्यवर उपस्थित

यावेळी गोवा मनोरंजन संस्था गोवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तारिक थॉमस, इस्रोचे समूह संचालक डॉ. टी. पी. दास, विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव जयंत सहस्रबुद्धे, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हरिलाल मेनन आणि विज्ञान परिषद, गोवाचे अध्यक्ष सुहास गोडसे यावेळी उपस्थित होते.
हेही वाचाःगोव्यात पेट्रोलचे दर उतरणार ?…

विज्ञान परिषद उत्कृष्ट काम करतेय

महोत्सवाला संबोधित करताना सुहास पेडणेकर म्हणाले,” “इ=एफ” म्हणजेच शिक्षण=भविष्य, हे एकविसाव्या शतकातील सर्वात महत्वाचे व शक्तिशाली समीकरण आहे.  विज्ञान आणि तंत्रज्ञानातील विकासावर देशाची प्रगती ठरते. विचारपूर्वक अश्या विज्ञानाचा प्रचार करणे हेच महत्वाचे आहे. विज्ञान परिषद उत्कृष्ट काम करत असून साय-फी च्या माध्यमातून विज्ञानाला चालना देण्यासाठी त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहे.”
हेही वाचाःराज्यात मास्क वापराच, पण…

विज्ञान म्हणजे आपल्या सभोवतालचे जग शोधणे

ते पुढे म्हणाले, की “विज्ञान म्हणजे वस्तुस्थितीचा अभ्यास करणे आहे. त्याचबरोबर विज्ञान म्हणजे आपल्या सभोवतालचे जग शोधणे, गोष्टी जाणून घेणे आणि नवीन व अद्भुत कल्पना विकसित करणे आहे. वैज्ञानिक शिक्षणाला चालना देण्यासाठी, सक्रियपणे वर्गाबाहेरील क्रियाकलापांद्वारे शिकणे आवश्यक आहे. यासाठी साय – फी उत्तम व्यासपीठ ठरले आहे”.
हेही वाचाःसर्वच ओडीपी रद्द ‘हे’ आहे कारण…

चित्रपट आम्हाला संदर्भ-आधारित शिक्षण देतात

डॉ. तारिक थॉमस म्हणाले, की “चित्रपट आम्हाला संदर्भ-आधारित शिक्षण देतात. चित्रपटांमध्ये एखाद्याचे ज्ञान वाढवण्याची क्षमता आहे. दरवर्षी, साय-फी नवनवीन विज्ञान संबंधित उपक्रमांचा समावेश करून, एका साध्या विज्ञान चित्रपट महोत्सवाच्या पलीकडे विस्तारत आहे. अशा प्रकारच्या महोत्सवाचे उद्दिष्ट मुलांना स्वप्न पाहण्यास प्रेरित करणे आहे आणि साय-फी द्वारे गेल्या अनेक वर्षांपासून ते शक्य होत आहे.”
हेही वाचाःगोव्यात विजेच्या दरांत वाढ होणार…

५००० हून अधिक प्रतिनिधींनींचा सहभाग

विज्ञान परिषदेचे संघटक सचिव आशिष ठाकूर देसाई यांनी या वर्षीच्या साय-फी २०२२ च्या आवृत्तीचा सविस्तर अहवाल, समारोप समारंभात सादर केला. या तीन दिवसीय महोत्सवात ५००० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला, ज्यात चित्रपट प्रदर्शन, कार्यशाळा आणि प्रदर्शनांचा समावेश होता.
हेही वाचाःराणेंच्या कॅबिनेट दर्जासाठी वार्षिक १.०९ कोटींचा खर्च…

सर्वोत्तम तीन विज्ञान लघुपट

विज्ञान लघुपट स्पर्धेचा भाग म्हणून, विज्ञान परिषदेला दहा विज्ञान लघुपटांचे अर्ज आले होते. सर्वोत्तम विज्ञान लघुपट पुढीलप्रमाणे आहेत:

अ) “द फॉरगोटन किंग ऑफ गोवन जंगल” – शुभम गवस आणि टीम

ब) “मायनिंग इन गोवा – बून ऑर बेन” – भूमी जैन

क) “लेट गोवा ब्रीद” – स्वाती मिश्रा आणि टीम

‘कोडेव्हर 2021 इंटरनॅशनल’ – राज्यस्तरीय विजेते

६व्या वर्गातील विजेते

१) सविता घाडी
२) आदित्य कालेकर – पहिला उपविजेता
३) सान्वी रायकर – दुसरी उपविजेती

७ व्या वर्गातील विजेते

१) निधी गावकर
२) आर्यन नाईक – पहिला उपविजेता
३) श्रेयश देसाई – द्वितीय उपविजेता

८वी वर्गातील विजेते

१) विघ्नेश शेट्ये
२) नोएल वालादारीस – पहिला उपविजेता
३) राबिया पठाणी – दुसरी उपविजेती

लोक निवड पुरस्कार – तृषा नाईक

प्रशंसनीय कामगिरी – अमिश शेर्लेकर

सर्वोत्कृष्ट शिक्षक समन्वयक – सानिया सय्यद

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!