असंवेदनशीलतेचा कळस! उगेत ३ म्हशींची हत्या; 1 जखमी

गोळ्या घालून हत्या केलाच संशय; पोलिसांचा तपास सुरू; शेतकऱ्याने कर्ज काढून घेतल्या होत्या म्हशी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः समाजात घडणाऱ्या घटना पाहिल्यास माणसाची संवेदनशिलता हरवलीये की काय असाच प्रश्न विचारावासा वाटतो. आज माणूस माणसाचा शत्रू झाल्याची उदाहरणं आपण अनेकवेळा पाहिली असतील, परंतु माणसाच्या असंवेदनशीलतेचा शिकार मुके प्राणीदेखील होताना दिसतायत. दक्षिण गोव्यातील उगे येथे माणसाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक प्रकार घडलाय.

हेही वाचाः होंडा भागातील लोकांसाठी पेपर मिल कारखाना ठरत आहे डोकेदुखी!

नक्की काय झालंय?

सांगेतील बोंबडे उगे येथे चार दुभत्या म्हशी माणसाच्या असंवेदनशीलतेचा शिकार झाल्यात. अतिशय क्रूरपणे ३ म्हशींची हत्या करण्यात आली आहे. तर एक म्हैस जखमी अवस्थेत सापडली आहे. या म्हशींवर गोळ्या झाडून त्यांना जीवे मारलं असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. ठार झालेल्या या म्हशी एका बागेत सापडून आल्यानंतर या भागात खळबळ उडालीये. त्याच प्रमाणे या प्रकारावर या भागातून संताप व्यक्त करण्यात येतोय.

रविवारी प्रकार उघडकीस

शनिवारी जखमी म्हैस आढळली आणि रविवारी ही संपूर्ण घटना उघडकीस आली. शुक्रवारपासून म्हशी बेपत्ता होत्या. त्यांचा शोध घेताना हा प्रकार दिसून आला. या घटनेची कल्पना सांगेचे पोलीस निरीक्षक सचिन पन्हाळकर यांना दिल्यानंतर सहा उपनिरीक्षक प्रल्हाद मिराशी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृत म्हशींची छायाचित्रे घेतली आणि माहिती गोळा केली. पुढील तपास करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं. यावेळी पोलिसांना मृत म्हशींवर बंदुकीच्या गोळ्या झाडल्याचे निशाणही दिसून आले.

जीवे मारण्याचं कारण काय?

या म्हशी चारा खाण्यासाठी एका बागायतीत घुसल्या असता त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना ठार केलं असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. म्हशी बायातीची नासधुस करत असल्याने त्यांना जीवे मारण्यात आलं असल्याचंगी बोललं जातंय. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे या प्रकारामागे नक्की कुणाचा हात आहे, याबद्दल अजून माहिती मिळालेली नाही. मात्र झाल्या प्रकाराची पोलिसांनी कसून चौकशी करावी अशी मागणी या भागातून जोर धरतेय.

हेही वाचाः हल्ला झाला तेव्हा अनवरच्या हातात पिस्तूल होतं! पण तो गोळी का झाडू शकला नाही?

कर्ज काढून घेतल्या होत्या म्हशी?

उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारची क्रूर घटना सांगे भागात प्रथमच घडली आहे. जानू यमकर या गरीब शेतकऱ्याने कर्ज काढून या म्हशी घेतल्या होत्या. या शेतकऱ्याची आर्थिक स्थितीही नाजूक आहे. या म्हशींच्या दुधावरच या शेतकऱ्याचं घर चालत असे. या प्रकार झाल्यानंतर या शेतकऱ्यावर मोठं आभाळ कोसळलंय. त्यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झालाय. प्रत्येक म्हशीपाठी पन्नास हजार याप्रमाणे दोन लाख रुपयांचं शेकऱ्याचं नुकसान झालं आहे. सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकऱ्याने केलीये.

हा व्हिडिओ पहाः Video | IPS | LADY SINGHAM | आयपीएस अस्लम खान गोव्याच्या पोलिस उपमहानिरीक्षक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!