CORONA UPDATE | रुग्णसंख्या बरे होण्याचा दर 90.71 टक्के

मंगळवारी 22 जणांचा कोविडमुळे मृत्यू, 903 नव्या बाधितांची नोंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो :राज्यातील कोरोना रुग्णवाढीची चिंता कायम आहे. राज्यात गेल्या 24 तासांत नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही दुप्पटपेक्षा जास्त नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे राज्याची सक्रिय रुग्णसंख्याही घटल्याचं पाहायला मिळतंय. तसंच राज्याचा रिकव्हरी रेट हा पुन्हा एकदा 90 टक्क्यांच्या पार गेलाय.

हेही वाचाः कोकणी कवी अशोक शिलकर यांची आत्महत्या

काय आहे नेमकी आकडेवारी

गेल्या २४ तासांत राज्यात एकूण 903 नव्या रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, 903 रुग्णांपैकी 810 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर 93 रुग्ण हे रुग्णालयात दाखल झालेत. दरम्यान, एकूण 4 हजार 720 कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य खात्यानं जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये देण्यात आली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे नव्या रुग्णांच्या संख्येच्या दुप्पटपेक्षा जास्त रुग्ण हे कोरोनातून बरे झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. नवे रुग्ण 903 जरी असले, तरी तब्बल १ हजार 777 रुग्ण दिवसभरात बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 139 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्जही देण्यात आलाय.

हेही वाचाः BREAKING | बारावीची परीक्षा अखेर रद्द

मृत्यूदराची चिंता कायमच!

दरम्यान, रुग्णवाढीला ब्रेक लागलेला असला आणि रुग्ण बरे होण्याचं प्रमाण जास्त असलं तरीही राज्यातील कोरोना मृत्यूदर आटोक्यात आल्याचं चित्र दिसून येत नाहीये. आधीपेक्षा मृत्यू होण्याच्या प्रमाणात घट जरी झाली असली, तरीही पुन्हा एकदा गेल्या 24 तासांत एकूण 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींचा एकूण आकडा हा 2 हजार 671 इतका झालाय.

महत्त्वाची बाब म्हणजे अजूनही सर्वाधिक रुग्ण हे मडगावात असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ फोंड्यातही सक्रिय रुग्णसंख्या काळजी करायला लावणारी अशी आहे. दक्षिण गोव्यानंतर उत्तर गोव्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या ही सध्या पणजी आहे. मात्र उत्तर गोव्यातील सर्वच ठिकाणची सक्रिय रुग्णसंख्या ही 700च्या आत आल्याचं पाहायला मिळतंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!