स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी ‘या’ पंचायतीने दिले 26 हजार

युवकांनी घेतला पुढाकार; ग्रामपंचायतीची लाभली साथ

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्कोः तौक्ते वादळाने राज्यातील बऱ्याच भागाचं नुकसान केलंय. काही घरांवर झाडं पडून नुकसान झालंय. तर काही ठिकाणी तर सार्वजनिक मालमत्तेचंही नुकसान झालंय. चिकोळणा बोगमाळो पंचायत क्षेत्रातील चिकोळणा येथील हिंदु स्मशानभूमीच्या छप्पराची तौक्ते चक्रीवादळामुळे मोडतोड झाली आहे. त्यामुळे या स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी पंचायतीने 26 हजार रुपयांचं सहाय्य केलं. एका कार्यक्रमात सरपंच लोरोन डिकुन्हा यांनी सदर रकमेचा धनादेश स्मशानभूमी देखरेख समितीचे खजिनदार अनिल नाईक यांच्याकडे सुपुर्द केला. याप्रसंगी सुनील नाईक, साई नाईक, उपसरपंच संकल्प महाले उपस्थित होते.

हेही वाचाः ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज’ अंतर्गत 48 तासांत दाव्याची रक्कम मिळणार

युवकांनी घेतला पुढाकार

तौक्ते चक्रीवादळामुळे चिकोळणा बोगमळो परिसरातील झाडांची पडझड होऊन लोकांचं बरंच नुकसान झालंय. ग्रामपंचायत आणि स्थनिक युवकांनी पुढाकार घेऊन रस्त्यावरील अडथळे दूर करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज खात्याच्या कामगारांना सहकार्य केलं. या परिसरातील स्मशानभूमीचं छप्पर मोडून पडल्यानं वास्को हिंदू स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. स्थानिकांची ही अडचण लक्षात घेऊन स्थानिक युवक सदर स्मशानभूमी दुरुस्ती करण्यासाठी पुढे आलेत. त्यांना ग्रामपंचायतीची साथ लाभली.

हेही वाचाः बलात्कार प्रकरणातील तेजपालला हायकोर्टाची नोटीस

नुकासग्रस्तांना योग्य ती नुकसान भरपाई मिळणार

दरम्यान, वादळामुळे नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारच्या आपत्तकालीन व्यवस्थापनाकडे अर्ज पाठवले आहेत. त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असं संकल्प महाले यांनी सांगितलं. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!