मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं पॅकेज हे भाजपचं इलेक्शन रिव्हायव्हल पॅकेज

विरोधी पक्ष नेते दिगंबर कामतांची टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: गोव्यातील भाजप सरकार आज सर्व स्थरांवर सपशेल अपयशी ठरलंय. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत आता सारवासारव करुन सरकारची प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न करतायत. गोव्यातील दुर्बल घटकांसाठी शंभर कोटींचं पॅकेज जाहीर करावं अशी मागणी मी गेल्यावर्षीपासून करत आहे. काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं पॅकेज हे भाजपचं इलेक्शन रिव्हायव्हल पॅकेज आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते दिगंबर कामतांनी केली.

हेही वाचाः ‘आप’कडून संगीत चित्रफितीचे प्रकाशन

राज्यात काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यानंतरच गोंयकारांचं भाग्य बदलणार

गेल्या एक वर्षात काँग्रेस पक्ष सातत्याने मागणी करत असलेल्या योजनांचीच मुख्यमंत्री आता केवळ घोषणा करत आहे. मात्र त्यावर प्रत्यक्ष कृती होताना दिसत नाही. सरकारच्या सर्व घोषणा येत्या निवडणूकांपर्यंत केवळ कागदोपत्रीच राहणार आहेत. गोमंतकीयांचं भाग्य २०२२ मध्ये राज्यात काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यानंतरच बदलणार आहे, असं कामत म्हणाले.

हेही वाचाः आजपासून पुढील 4 दिवस राज्यात जोरदार सरींची शक्यता

पारंपरिक व्यावसायीकांना जाहीर केलेली रक्कम तुटपुंजी

आजच्या कोविड महामारीच्या बिकट काळात राज्यातील पारंपरिक व्यावसायीकांना सरकारने जाहीर केलेली रुपये पाच हजारांची रक्कम अगदी तुटपुंजी आहे. सरकारने त्यांना आता किमान रु. २५ हजार देणं गरजेचं आहे, अशी मागणी कामतांनी केली.

हेही वाचाः आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक हल्ला प्रकरणः गुन्हेगारांना लवकरच अटक करणार

मोबाईल टॉवरसाठी भाडे कपता जाहीर करण्यामागे सरकारचा छुपा अजेंडा

सरकारने राज्यातील मोबाईल टॉवरसाठी भाडे कपता जाहीर करण्यामागे सरकारचा छुपा अजेंडा असल्याचा संशय येतो. सरकार क्रोनी क्लबला मदत करण्यासाठीच असे प्रयत्न करत आहे. राज्यातील प्रत्येक पंचायतीच्या दारात पोहोचलेली भूमीगत ऑप्टिक फायबर केबलची ब्रॉड बॅंड नेटवर्क सुविधेचा विस्तार करण्यास भाजप सरकार का टाळाटाळ करतंय याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे, असं कामत म्हणाले.

हेही वाचाः एकनाथ खडसे ‘ईडी’ कार्यालयात दाखल ; चौकशी सुरू

पारंपरिक व्यावसायिकांना मदत करणं गरजेचं

सरकारने अल्प काळाचा दिलासा देण्याऐवजी काँग्रेस सरकारने चालीस लावलेली ‘गोंयचें दायज’ योजना कार्यांवित करुन मोटर सायकल पायलट, पोदेर, रेंदेर, फुलकार, खाजेकार, न्हावी, चर्मकार, काकणकार अशा पारंपरिक व्यावसायीकांना मदत करणं गरजेचं आहे, असं कामत म्हणाले.

हेही वाचाः म्हापसा बाजारपेठ पूर्ण क्षमतेने खुली; बुधवारपासून विक्रेत्यांना व्यवहार करण्याची मुभा

काँग्रेस सत्तेवर आल्यानंतरच ‘गोवा व्हिजन-२०३५’ची अंमलबजावणी होणार

नामवंत शास्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांचा समावेश असलेल्या समितीने तयार केलेला ‘गोवा व्हिजन-२०३५’ अहवाल भाजप सरकारने कपाटात बंद करुन ठेवला आहे. आता २०२२ मध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतरच सदर अहवालाची अंमलबजावणी होणार आणि गोंयकारांचं भाग्य उजळणार, असा दावा कामतांनी केलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!