तरुण तेजपाल प्रकरणातील निकाल दुर्दैवी

सरकार या निर्णयाला लवकरच हायकोर्टात आव्हान देणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः तहलकाचे संस्थापक तरुण तेजपाल विरूद्धच्या खटल्याचा अंतिम निवाडा शुक्रवारी पार पडला. तेजपाल यांच्यावरच्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मात्र हा निकाल दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलीये.

हायकोर्टात आव्हान देणार

तरुण तेजपाल प्रकरणातील निकाल हा धक्कादायक आणि दुर्दैवी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. जिल्हा न्यायालयाने तरुण तेजपाल प्रकरणात दिलेल्या या निकालावर राज्य सरकारने असंतोष व्यक्त केला आहे. राज्य सरकार या निकालावर नाखूश असून जिल्हा न्यायालयाने दिलेल्या या निकालावर हायकोर्टात आव्हान देणार असल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी म्हटलंय.

हेही वाचाः तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता

मुख्यमंत्री म्हणाले,

गोव्यात एका महिलेवर झालेला अन्याय अजिबात सहन केला जाणार नाही. त्याही पुढे जाऊन अशा प्रकारचा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. जिल्हा न्यायालयाने तरुण तेजपाल प्रकरणात दिलेला हा निकाल नक्कीच समाधानकारक नाहीये. त्यामुळे लवकरच आम्ही याविरुद्ध हायकोर्टात आव्हान देणार आहोत. तसंच याविषयी मी स्वतः पब्लिक प्रॉसिक्यूटर आणि इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर यांच्याशी हायकोर्टात या निकालाला आव्हान देण्याबद्दल चर्चा करणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!