साखळी नगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव फेटाळला

भाजप गट गैरहजर; पार्सेकर, सावळ यांनाचा पुन्हा विजय

विशांत वझे | प्रतिनिधी

डिचोली: साखळी पालिका नगराध्यक्ष राया पार्सेकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव आज बारगळला. भाजप गटाचे सहा ही नागरसेवक बैठकीस आले नाहीत, तर सत्ताधारी धर्मेश सागलानी गटाचे सागलानी, राजेंद्र आमेशकर, कुंदा माडकर, ज्योती ब्लेगंन, राया पार्सेकर, अँसिरा खान, राजेश सावळ हे सातही नगरसेवक हजर होते.

हेही वाचाः जॉनसन अँड जॉनसनच्या सिंगल डोस लसीला भारतात मंजूरी

पार्सेकर, सावळ यांनाचा पुन्हा विजय

भाजप गटाचे 6 नगरसेवक यावेळी बैठकीस हजर नसल्यानं निर्वाचन अधिकारी कबीर शिरगावकर यांनी सदर अविश्वास फेटाळण्यात आल्याचं जाहीर केलं. त्यामुळे साखळी पालिकेतील नगराध्यक्ष राया पार्सेकर आणि उपनगराध्यक्ष राजेश सावळ यांचा पुन्हा विजय झाला आहे. 

हेही वाचाः पत्नीच्या आरोपांवर हनी सिंहचं जाहीर उत्तर

आता तरी विकासाकडे लक्ष द्याः राया पार्सेकर

भाजपतर्फे सतत आमची सत्ता पालटण्याचे अनेक प्रयत्न झालेत. मात्र त्यात भाजपला यश आलं नाही. किमान आता तरी सर्वानी साखळीचा विकास करण्यासाठी एकत्र येऊन सहकार्य करा, असं  आवाहन नगराध्यक्ष राया पार्सेकर यांनी केलं. विधानसभा निवडणूक सहा  महिन्यांनी आहे. त्यामुळे प्रलंबित योजना मार्गी लावण्यासाठी सहकार्य करायचं सोडून असलं घाणेरडं राजकारण का खेळता? आम्ही सारे संघटित आहोत, असं राया पार्सेकर म्हणाले.

हा व्हिडिओ पहाः Video | MOPA #LINK#ROAD| तुळस्करवाडी ग्रामस्थ बनले आक्रमक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!