Goa Congress | काँग्रेसची नवी टीम गोमंतकीयांसाठी नवी ऊर्जा आणि नवी कल्पना घेऊन येणार : अमित पाटकर

धीम्या गतीने भविष्यासाठी राजकीय रणनीती आखत आहोत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोवा काँग्रेसची नवी टीम गोवा आणि गोमंतकीयांसाठी नवीन ऊर्जा आणि नवीन कल्पना घेऊन येणार आहे असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केला. याबाबतची माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
हेही वाचाःउत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ‘पिट बूल’ आणि ‘रॉटवायलर’ या श्वान प्रजातींवर बंदी, ‘कारण’…

धिसाडघाईने घेतलेले निर्णय पक्षाला मारक ठरतात

अमित पाटकर पुढे म्हणाले की, “मी सध्या काँग्रेसची संघटना स्थिर करण्यासाठी काम करत आहे. मी आमचे तिन्ही आमदार, दक्षिण गोव्याचे खासदार आणि पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या समन्वयाने काम करत आहे. आम्ही धीम्या गतीने भविष्यासाठी राजकीय रणनीती आखत आहोत. संपुर्ण अभ्यास व विश्लेषण करुनच आम्ही आता मार्गक्रमण करणार आहोत. धिसाडघाईने घेतलेले निर्णय हे पक्षाला मारक ठरतात याची आम्हाला जाणीव असल्याचे अमित पाटकरांनी म्हटले आहे.
हेही वाचाःड्रग्ज प्रकरणी सांतिनेज, मेरशीत छापा, दोघांना अटक…

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व चैतन्य आणण्यासाठी पाऊले उचलणार

पाटकर पुढे म्हणाले, “आम्ही लवकरच आमच्या राष्ट्रीय नेत्यांना भेटून त्यांना गोव्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती देणार आहोत आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व चैतन्य आणण्यासाठी पाऊले उचलणार आहोत. गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना काही असंतुष्ट आत्म्यांची कार्यपद्धती लक्षात आली आहे. जे काँग्रेस पक्षाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि पडद्यामागील त्यांच्या कुटील कारस्थानांनी गोंधळ निर्माण करतात. पक्षाची प्रतिमा खराब करणाऱ्या अशा सर्व शक्तींना आम्ही पूर्णपणे नष्ट करू इच्छितो आणि सचोटी व जिद्धीची नवीन स्वच्छ कोरी पाटी घेवून एकसंघपणे त्यावर आम्ही पक्षाचे समृद्ध भविष्य लिहीण्याचे काम करू इच्छितो, अशी माहिती अमित पाटकर यांनी दिली.
हेही वाचाःमुले पळविल्याच्या अफवांवरुन संशयिताला मारहाण…

दगाबाजी आणि विश्वासघात करणार्‍यांसाठी पक्षाचे दरवाजे बंद

आठ आमदारांच्या भाजप प्रवेशानंतर काही लोक त्यांचा स्वार्थ साधत नसल्याने तसेच बेगडी पक्षनिष्ठेचे पीतळ उघडे पडल्याने त्रस्त झाले आहेत आणि तेच लोक आता अफवा पसरवून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सांगून अमित पाटकर म्हणाले, “दगाबाजी आणि विश्वासघात करणार्‍यांसाठी काँग्रेस पक्षाचे दरवाजे कायमचे बंद आहेत. आड मार्गाने प्रवेश मिळवण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी विश्वासघातक्यांना पक्षात घ्यायचे नाही यावर प्रदेश कॉंग्रेस ठाम आहे.” माझ्याकडे तरुण आणि उत्साही कार्यकर्त्यांची एक नवीन टीम आहे. आमचे तीन आमदारही नवीन, तरुण आणि उत्साही आहेत. आठ आमदारांचे बाहेर पडणे हे एका अर्थाने आम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची आणि गोमंतकीयांचा विश्वास जिंकण्याची संधी आहे असे पाटकर पुढे म्हणाले.
हेही वाचाःराज्यातील आठ गायींना लंपी रोगाची झाली लागण…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!