वाठादेव-डिचोलीतील परप्रांतीय महिलेचा खुनी पती अटकेत…

चार वर्षीय मुलीची ‘अपना घर’मध्ये रवानगी

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोली : वाठादेव-डिचोलीत परप्रांतीय महिलेचा खून करून पळून गेलेल्या पतीला पकडण्यात पोलिसांना यश आलं. बलीराम अनंतकुमार महातो यानं पत्नी शोभादेवी हिचा गळा आवळून खून केल्याचं निष्पन्न झालं.
हेही वाचाःमहागाईचा कहर! सामन्यांच्या खिशाला पुन्हा कात्री…

रेल्वेस्थानकावर रेल्वे पोलिसांच्या मदतीनं पकडण्यात आलं

वाठादेव डिचोली इथं एका परप्रांतीय महिलेच्या खुनाची घटना समोर आली होती. या खुनाचा आरोपी तिचा नवराच असेल या संशयावरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आरोपीनं कसालाच पुरावा न ठेवल्यानं तपासात अडथळे येत होते. परंतू आरोपीच्या भावाच्या मोबाईलवरून त्याला मध्यप्रदेशातील झांसी रेल्वेस्थानकावर रेल्वे पोलिसांच्या मदतीनं पकडण्यात आलं. त्यानंतर डिचोली पोलिस निरीक्षक सूरज गांवस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल पोळेकर, हेड कॉन्स्टेबल विजय मांद्रेकर आणि पोलिस कॉन्स्टेबल रंजिश बाले यांनी आरोपीला मध्यप्रदेश ला जाऊन ताब्यात घेतलं.
हेही वाचाःमंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ महत्वाचे निर्णय, वाचा सविस्तर…

दारूच्या व्यसनातून पत्नीचा खून

प्रथमश्रेणी न्यायालयानं आरोपीला 14 दिवसांचा रिमांड दिलाय. बलीराम महातो यानं दारूच्या व्यसनातून पत्नीचा खून केल्याचं चौकशीदरम्यान निष्पन्न झालं. एका बाजूला काम नाही, त्यात पतीला दारूचं व्यसन यामुळे त्यांचे असूनमधून खटके उडत होते. त्यातूनच बलीराम यानं शोभादेवीचा गळा आळून खून केल्याची कबुली दिलीय. दरम्यान, त्याच्या चार वर्षीय बालिकेला पोलिसांनी ताब्यात घेऊन ‘अपना घर’मध्ये रवानगी केलीये.
हेही वाचाःदिव्यांगजन स्वावलंबन योजनेचा लाभ घ्या…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!