अर्भक कचराकुंडीत फेकणारी माता सापडली

वाळपईतील घटना; 27 मार्चला 7 महिन्याचं अर्भक मृतावस्थेत सापडलं होतं

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपईः तीन महिन्यांपूर्वी वाळपई नगरपालिकेच्या कचराकुंडीमध्ये अर्भक सोडणाऱ्या महिलेचा शोध लावण्यात वाळपई पोलीसांना यश आलंय. सदर महिला होंडा पंचायत क्षेत्रातील असून तिच्यावर कारवाई करण्यासंदर्भात कागदपत्र सोपस्कार सुरू असल्याची माहिती वाळपई पोलिस अधिकाऱ्यांनी दिलीये.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात १०२ दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या आढळली

27 मार्चला कचरा कुंडीत सापडलं होतं अर्भक

27 मार्च रोजी वाळपई नगरपालिकेच्या कचरा कुंडीमध्ये तांबड्या कपड्यांमध्ये गुंडाळलेलं 7 महिन्याचं अर्भक मृतावस्थेत सापडलं होतं. तेव्हापासून सदर प्रकरणात गुंतलेल्या महिलेचा शोध घेण्याचं काम  पोलिसांनी सुरू केलं होतं.  वेगवेगळ्या स्तरावर चौकशी करण्यात आल्यानंतर सदर महिला होंडा पंचायत क्षेत्रातील असल्याचं स्पष्ट झालं आहे. सदर महिलेने गुन्हा केला असून तिच्यावर पोलीस कारवाई करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचाः तरुणीला वाचवण्यासाठी युवकाची मांडवीत उडी

पोलिसांच्या तपासाला यश; पुढील कार्यवाही सुरू

कचरा कुंडीत अर्भक सापडल्यानंतर यामुळे वाळपई भागात मोठ्या प्रमाणात खळबळ निर्माण झाली होती. सदर मातेचा शोध घ्यावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी लावून धरली होती. गेले अडीच ते तीन महिने वाळपई पोलिस या प्रकरणाची चौकशी करताना मातेचा शोध घेत होते. मातेला शोधून काढण्याचं मोठं आव्हान वाळपई पोलिसांसमोर होतं. या कार्यात पोलिसांना यश आलंय. या संदर्भातील पुढील तपास सुरू असल्याचं वाळपई पोलिसांनी सांगितलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!