20 महिन्यांचं प्रेम पडलं महागात! लग्नाच्या आमिषाने युवतीला घातला 10 लाखांचा गंडा

म्हापशातील प्रकार; संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: लग्नाचं आश्वासन देऊन म्हापशातील एका युवतीला १० लाख ३५ हजाराचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी मुबाशीर खाझी (३४, रा. बुलढाणा – महाराष्ट्र) विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

जानेवारी २०२० ते ११ सप्टेंबर २०२१ दरम्यानचा प्रकार

हा प्रकार जानेवारी २०२० ते ११ सप्टेंबर २०२१ दरम्यान घडला आहे. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, फिर्यादी युवतीशी संशयिताने मैत्री केली. नंतर तिच्याशी लग्न करण्याचं आश्वासन दिलं. वरील २० महिन्यांत संशयिताने फिर्यादीला विश्वासात घेऊन तिच्याकडून मदत म्हणून टप्प्याटप्यान १० लाख ३५ हजार रूपये रक्कम घेतली. पण, संशयित लग्नाचं नावही घेत नाही. तसंच पैसे परत करण्यास वेळकाढूपणा करीत आहे, असं फिर्यादीच्या लक्षात आलं.

पैसे परत करण्यास नकार देत जीवे मारण्याची धमकी दिली

आपली फसवणूक झाल्याची कल्पना येताच फिर्यादीने संशयिताकडे पैसे परत करण्याची मागणी केली. पण, त्याने पैसे परत करण्यास नकार देत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर संबंधित युवतीने तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!