‘तिळारी’ची पातळी वाढली; सावधानता बाळगा!

शापोराकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या सूचना; अधिकृत आदेश जारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: दोडामार्गातील तिळारी धरणातील पाण्याची पातळी शिखर स्तरापर्यंत पोहोचली आहे. या पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानंतर शापोरा नदीच्या पाणी पातळीत वाढ होईल. त्यामुळे शापोरा नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगावी, अशी सूचना डिचोली मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी जारी केली आहे. तसा अधिकृत आदेश देणार परिपत्रक त्यांनी जारी केलंय.

हेही वाचाः जहाँ हुए बलिदान मुखर्जी वह काश्मीर हमारा है

तिळारी धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तिळारी धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पाणी शिखर स्तरापर्यंत पोहोचली आहे. अशा परिस्थितीत तेथून पाण्याचा कधीही विसर्ग सुरू होऊ शकतो. विसर्ग झाल्यानंतर तिळारीसह गोव्यातील शापोरा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन त्याचा फटका नदी किनारच्या रहिवाशांना बसू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सावध रहावे. नदीपात्रात उतरू नये, असं आवाहन मामलेदार पंडित यांनी केलंय.

गतवर्षी आला होता पूर

गेल्या वर्षी तिळारीतून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानंतर शापोरा नदीला पूर आला होता. त्याचा मोठा फटका बार्देश, डिचोली आणि सत्तरीतील गावांना बसला होता. अनेकांचे संसार वाहून गेले होते. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. अनेक नागरिकांना स्थलांतरितही व्हावं लागलं होतं. तशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!