सरकारी यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे वेलिंग प्रियोळात दरड कोसळली

रिव्होल्यूशनरी गोवन्सनेचा सरकारवर आरोप; सुदैवाने जिवीतहानी टळली

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडाः सरकारी यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे वेलिंग प्रियोळात दरड कोसळली, असा आरोप रिव्होल्यूशनरी गोवन्सने केलाय. वेलिंग प्रियोळ गावातील गावकरवाडा या ठिकाणी मंगळवारी दुपारी १२ वाजता दरड कोसळण्याची घटना घडली. या घटनेत मोठमोठे दगड रस्त्यावर पडल्यानं रस्ता बंद झाला. सुदैवाने ही घटना घडताना तिथून कुठलं वाहन अथवा पादचारी ये जा करत नसल्यानं मोठा अपघात टळलाय.

सरकारी यंत्रणेचा बेजबाबदारपणा नडला

दरम्यान रिव्होल्यूशनरी गोवन्सचे (आरजी) सहसंस्थापक विश्वेश नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. गेल्या एप्रिल महिन्यात आम्ही ही गोष्ट समाज माध्यमाद्वारे सरकारच्या नजरेत आणली होती की, ही दरड खूप भयानक स्थितीत आहे, आणि लोकांच्या जीवाला यापासून धोका आहे. यावर त्वरित उपाय करावा. पण सरकारी यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडली, असं आरजीचे विश्वेश नाईक म्हणाले.

‘आरजी’ने आवाज उठवल्यावर प्रशासनाला आली जाग

प्रत्येक वर्षी पावसाळ्यात असंच होतं. स्थानिक पंच, सरपंच किंवा आमदार, कुणीच यावर लक्ष देत नाही आणि आम्हाला जीव मुठीत धरून दिवस काढावे लागतात. शेवटी जेव्हा आरजीने ही बातमी समाज माध्यमावर दाखवली, तेव्हा निंद्रावस्थेथ असलेलं प्रशासन खडबडून जागं झालं आणि काम सुरू झालं, असं स्थानिक त्रिविक्रम प्रभुगावकर म्हणाले.

हा व्हिडिओ पहाः Video | MOBILE | E LEARNING | शुभम शिवलकर, रमेश भोवी यांच्या प्रयत्नांना यश

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!