गुन्ह्यांचा छडा लावण्याचं प्रमाण 80.25 टक्के

1 जानेवारी ते 30 एप्रिल 2021 मधील पोलिसांच्या कामगिरीचा अहवाल

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी: गोवा पोलिसांनी 1 जानेवारी ते 30 एप्रिल 2021 या चार महिन्यांच्या काळात खून, बलात्कार, अत्याचार, चोऱ्या, फसवणूक, अपहरण, दरोडा आदी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली 684 गुन्हे दाखल केले आहेत. त्यांपैकी 564 गुन्ह्यांचा छडा लावून संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं. तपास लावण्याचं हे प्रमाण 80.25 टक्के एवढे आहे. शिवाय करोनाच्या पार्श्वभूमीवर वरील कालावधीत मास्कविना फिरणाऱ्या 74 हजार 678 जणांवर तर इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मिळून 1 कोटी 67 लाख 16 हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचाः मासळी खरेदीसाठी सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

1 जानेवारी ते 30 एप्रिल 2021 मधील पोलिसांच्या कामगिरीचा अहवाल

गोवा पोलिसांच्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी ते 30 एप्रिल 2021 या चार महिन्यांच्या काळात भा.दं.सं.च्या विविध कलमांखाली उत्तर गोवा पोलीस स्थानकात 400 गुन्ह्यांची नोंद झाली. यातील 321 गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला आहे. दक्षिण गोवा पोलीस स्थानकात 284 गुन्हे दाखल झाले. त्यातील 243 गुन्ह्यांचा छडा लावून संशयितांना अटक करण्यात आली आहे. आकडेवारी पाहता उत्तर गोवा पोलिसांचे छडा लावण्याचे प्रमाण 80.25 टक्के तर दक्षिण गोवा पोलिसांचा 84.56 टक्के एवढे आहे. त्यामुळे उत्तरेपेक्षा दक्षिणेतील पोलिसांची कामगिरी सरस ठरली आहे. खून, बलात्कार व इतर गंभीर गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांनी चांगली कामगिरी केली आहे. अशा 97.5 टक्के गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. घरफोड्या, दरोडा, मोबाईल, वाहन चोऱ्या व अन्य प्रकारच्या चोऱ्यांचे तपास लावण्याचे प्रमाण मात्र 55.05 टक्के एवढं आहे.

हेही वाचाः गोव्यातील पहिली ‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’ केपेत कार्यान्वित

चार महिन्यांतील तपासाची आकडेवारी

गत चार महिन्यांत राज्यात 5 खून, 10 खुनाचा प्रयत्न, 1 सदोष मनुष्यवधाची तर 24 बलात्कारांची मिळून 40 गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली होती. यातील खुनाचा एक गुन्हा वगळता इतर सर्व गुन्ह्यांचा 100 टक्के तपास लावण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.

9 चोऱ्या, भरदिवसा 9 चोऱ्या, रात्रीच्या वेळी 29 चोऱ्या, मोबाईल, वाहने आणि अन्य प्रकारच्या मिळून वरील कालावधीत 151 चोऱ्यांचे नोंद झाला होता. यातील 8 चोऱ्या, भरदिवसाची 1 चोरी, रात्रीच्या वेळीच्या 13 चोऱ्या, मोबाईल, वाहने व अन्य प्रकारच्या चोऱ्या मिळून 87 चोऱ्यांचे तपास लावण्यात यश आलं.

वरील कालावधीत 34 फसवणुकीचे गुन्हे नोंद झाले आहेत. यांतील 24 गुन्ह्यांचा तपास लागला. 12 विश्वासघाताचे गुन्हे दाखल झाले आहेत. यातील 11 गुन्ह्यांचा तपास लावण्यात आला आहे. 22 अपहरणाचे गुन्हे दाखल झाले आहेत. यातील 29 गुन्ह्यांचा तपास लागला आहे.

102 मारहाणीचे गुन्हे नोंद केले आहेत. यातली 101 गुन्ह्यांत संशयितांना अटक करण्यात आली होती. तर अपघाती मृत्यूचे 45 गुन्हे दाखल करण्यात आले. यातील 44 गुन्ह्यांत संशयितांना अटक करण्यात आली होती.

हेही वाचाः आता मास्क घालून बोलणं झालं सोप्पं

गत 4 महिन्यात 34 गुन्हे दाखल करून 40 जणांना अटक

गत चार महिन्यांत करोनाच्या पार्श्वभूमीवर आदेशाचे पालन न केल्यामुळे पोलिसांनी 34 गुन्हे दाखल करून 40 जणांना अटक केली आहे. तर सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यामुळे 74,678 जणांवर, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी 4,864 जणांवर आणि पान, गुटखा खाल्याप्रकरणी 1,804 जणांवर कारवाई करून 1 कोटी 67 लाख 16 हजार 300 रुपये दंड वसूल केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!