भारतीय सेना ही जगात उत्कृष्ट सेना मानली जाते

भारतीय नौदलाच्या गोवा विभागाचे ध्वजाधिकारी रिअर अँडमिरल फिलिपोज पायनुमुटील यांचं प्रतिपादन

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्कोः भारतीय सेना ही जगात एक उत्कृष्ट सेना मानली जाते. तुम्ही त्या सेनामध्ये सामील होण्यास जात आहात. सिग्नल्सचे लष्करी पथक भारतीय सेनाचं एक उत्कृष्ट सेना पथक मानलं जातं. त्या नावाला आपल्याला जागलं पाहिजे. या पथकाप्रति ‘ईमानदारी, प्रामाणिकपणा आणि सभ्यता’ या तीन गोष्टी सतत लक्षात ठेवा, असं आवाहन भारतीय नौदलाच्या गोवा विभागाचे ध्वजाधिकारी रिअर अँडमिरल फिलिपोज पायनुमुटील यांनी केलं. गोव्यातील 3 एमटीआरमध्ये 123 जणांनी आपलं 19 आठवड्यांचं बेसिक मिलेटरी ट्रेनिंग पूर्ण केलं. या ट्रेनिंगच्या समारोपप्रसंगी पायनुमूटील बोलत होते.

हेही वाचाः स्थानिकांना नको असल्यास प्रकल्प आणू देणार नाही

आपल्या सेवेत उच्च दर्जाचं ज्ञान, कुशलता पदरात पाडून घ्या

3 एमटीआरने आतापर्यंत 90 हजारांपेक्षा अधिकजणांना सैनिकी प्रशिक्षण दिलं. त्यामध्ये प्रशिक्षकांचं मोठं योगदान आहे. सिग्नल्सच्या लष्करी पथकामध्ये गेल्या काही वर्षांत मोठे क्रांतिकारी बदल झालेत. आज आमच्याकडे जगातील सर्वात आधुनिक दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान आहे, जे कोणत्याही प्रकारच्या जमीन, मोसम आणि परिस्थितीमध्ये दूरसंचार व्यवस्था उपलब्ध करण्यामध्ये सक्षम आहे. सैनिकांच्या तीन दलामध्ये सिग्नल्स आणि संचार ऑपरेशन सर्वात निर्णायक भूमिका निभावतात. दूरसंचार जगामध्ये व्यापक रुपाने विकसित झालं आहे. या विशाल परिवर्तनावर प्रत्येक जवानाने नजर ठेवा. आपल्या सेवेमध्ये उच्च दर्जाचे ज्ञान आणि कुशलता पदरात पाडून घ्या, असं आवाहन पायनुमूटील यांनी केलं.  

हेही वाचाः सावंत सरकारात कोरोना काळातही विकासाला गती

कर्तव्याची जाणीव ठेवा

आपल्या शेजारच्या राष्ट्रांची अनिश्चितता, प्राकृतिक संकटं आणि सध्या सुरू असलेली कोविड महामारी लक्षात ठेवता प्रत्येक सैनिकाने आपल्या कर्तव्याची जाण ठेवून पूर्णपणे सक्षम झालं पाहिजे, असं ते म्हणाले.

हेही वाचाः मोरजीत गटाराचे तीनतेरा, पाणी रस्त्यावर

2 एसटीसीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच परेडची समीक्षा करण्यासाठी एका नौदलाच्या अधिकाऱ्याला संधी देण्यात आली. याबद्दल पायनुमूटील यांनी 2 एसटीसी बिग्रेडिअर संजय रावल यांचे आभार मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!