शिकारही गेली अन् शिकारीही !

दोडामार्गातल्या तिलारी इथली घटना

संदिप देसाई | प्रतिनिधी

दोडामार्ग : बिबट्याने कुत्र्याच्या शिकारीसाठी फिल्डिंग लावली खरी, मात्र ऐनवेळी सावधगिरी बाळगून धूम ठोकणाऱ्या कुत्र्याला पकडण्यासाठी बिबट्याने त्याचा जिवाच्या आकांताने पाठलाग केला. मात्र जीव वाचवण्यासाठी कुत्र्याची व शिकारीसाठी बिबट्याची सुरू असलेली धडपड दोघांच्या जीवावर बेतली.. ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी तिलारी येथे उघडकीस आली. त्यानंतर दोडामार्गचे वनपाल गजानन पाणपट्टे यांनी टीमसह घटनास्थळी जात त्या मृत बिबट्याचे पुढील प्रशासकीय सोपस्कार पूर्ण केले.

बिबट्याने कुत्र्याच्या शिकारीसाठी फिल्डिंग लावली खरी, मात्र ऐनवेळी सावधगिरी बाळगून धूम ठोकणाऱ्या कुत्र्याला पकडण्यासाठी बिबट्याने त्याचा जिवाच्या आकांताने पाठलाग केला. मात्र जिव वाचवण्यासाठी कुत्र्याची व शिकारीसाठी बिबट्याची सुरू असलेली धडपड दोघांच्या जीवावर बेतली. कुत्र्याच्या पाठोपाठ बिबट्याही शेतविहिरीत पडला. दोघांचा बुडून मृत्यू झाला.

आज शेतकरी किशोर शेटवे यांच्या विहिरीत मृत बिबट्या व कुत्रा तरंगल्याचे पाहिले आणि हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. मृत बिबट्या व कुत्र्याचे मृतदेह पाण्याबाहेर काढून बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!