मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोवा बाझार संकेतस्थळाचे उद्घाटन

15 ऑगस्ट रोजी उद्घाटन सोहळा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः ग्रामीण भागात शाश्वत उपजीविकेला प्रोत्साहन देणारा गोवा राज्य ग्रामीण उपजीविका मिशनचा (जीएसआरएलएम) हा गोवा सरकारचा उपक्रम आहे. रविवारी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्रदिनाच्या दिवशी ‘जीएसआरएलएम’च्या www.goabazaar.org या संकेतस्थळाचे मु्ख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या संकेतस्थळाच्या उद्घाटनानंतर या मोहिमेत ग्रामीण महिला बचत गटांना (एसएचजी) क्षमता निर्मिती, क्रेडिट लिंकेज, उपजीविका आणि बाजारपेठेचा आधार सक्षम करण्यासाठी मदत मिळणार आहे.

हेही वाचाः ॲस्टर सीएमआय रुग्णालयात गोव्यातील तरुणीला लिव्हर प्रत्यारोपण करून दिलं जीवदान

या कार्यक्रमाला ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो, पणजी मतदारसंघाचे आमदार आतान्सिओ मोन्सेरात, पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहित ज्यो मोन्सेरात, ग्रामीण विकास संचालक आयएएस संजय गिहर, अखिल गोवा स्वयंसहाय्य गटांच्या अध्यक्ष सुलक्षणा सावंत यांची उपस्थिती असणार आहे.

एका क्लिकवर स्वयंसहाय्य गटांनी बनवलेली उत्पादने होणार उपलब्ध

स्वयंसहाय्य गटांनी बनवलेली उत्पादने एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी सरकार ‘www.goabazaar.org’ या संकेतस्थळाची सुरुवात करत आहे. सध्या स्वयंसहाय्य निर्माते स्वत:ची लेबल्स वापरतात आणि स्वत:च उत्पादनांचं मार्केटिंग करतात. यात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. म्हणूनच, राज्य सरकारने स्वयं सहाय्य गटांकडून निर्मित उत्पादनांसाठी शहराच्या कानाकोपऱ्यातील बाजारपेठा काबीज करण्यासाठी सर्व स्वयंसहाय्य गटांची उत्पादने एका ब्रँडच्या नावाने आणि लोगोखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. या स्वयंसहाय्य गटांनी तयार केलेली सर्व उत्पादने ‘स्त्री शक्ती’ या ब्रँड खाली विकली जातील. जेव्हा आपण स्त्रीशक्ती उत्पादने खरेदी करता तेव्हा आपण महिला स्वयंसहाय्य गटांतील सदस्यांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देणार आहात आणि ग्रामीण गोव्यात महिला सक्षमीकरणात योगदान देणार आहात.

200 हून अधिक उत्पादने गोवा बाजार वेबसाइटद्वारे खरेदी केली जाऊ शकतात

या संकेतस्थळावर गोव्याच्या १२ ब्लॉक्समध्ये तयार होणारे अस्सल घरगुती पदार्थ, हस्तकला, घरगुती सजावटीच्या वस्तू, सेंद्रिय शेतीमाल, सेवा, भरतकाम उत्पादने देऊ केली आहेत. या पावलामुळे खेड्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनविण्यात आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत एकूणच सुधारण्यात मोठ्या प्रमाणात मदत होईल. एका प्रसिद्धीपत्रकानुसार, 157 स्वयंसहाय्य गटांमधून 200 हून अधिक उत्पादने सुरुवातीला गोवा बाजार वेबसाइटद्वारे खरेदी केली जाऊ शकतात. नंतर उर्वरीत उत्पादने समाविष्ट केली जातील. या संकेतस्थळावर ग्राहक या स्वयंसहाय्य गटांनी बनवलेली दर्जेदार उत्पादने शोधू शकतात, खरेदी करू शकतात आणि या व्यासपीठाद्वारे कारागिरांबद्दल अधिक जाणून घेऊ शकतात.

हेही वाचाः स्वाभिमान टिकवून ठेवण्यासाठी एकसंघ राहून मार्गक्रमण करण्याची गरज

ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना लाभ मिळवून देणे

गोवा राज्य ग्रामीण उपजीविका मिशनचा (जीएसआरएलएम) मुख्य उद्देश म्हणजे गोवा राज्यातील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना लाभ मिळवून देणे असा आहे. ग्रामीण भागातील गरीब महिलांचे जीवनमान उंचावणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे हेही त्यांचे उद्दीष्ट आहे. गोव्यातील ग्रामीण कुटुंबांना विशेषत: महिलांना आर्थिकदृश्ट्या सशक्त बनविण्याचाही मिशनचा उद्देश आहे.

हेही वाचाः आयबीचे गोवा विभाग प्रमुख अरविंद कुमार नायर यांना राष्ट्रपती पदक जाहीर

जीएसआरएलएम 3000 बचत गटांसह कार्यरत

आजपर्यंत जीएसआरएलएम 3000 बचत गटांसह कार्यरत असून 36,000 कुटुंबांपर्यंत पोचले आहे. अंमलबजावणीदरम्यान जीएसआरएलएमने स्वयं मदत गटाच्या सदस्यांना शेती व बिगर शेती क्षेत्रात ग्रामीण भागातील उदरनिर्वाहासाठी मदत केली आहे.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | MICKY PACHECO| मिकी पाशेकोंचा बिनशर्त काँग्रेस प्रवेश- दिनेश राव




ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!