FIRE | फ्रिजमध्ये शॉर्ट सर्किट होऊन घराला आग

फोंड्यातील घटना; सुदैवाने जिवीतहानी नाही; सुमारे दीड लाखांचं नुकसान

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः फोंड्यात मंगळवारी एका घरातील फ्रिजमध्ये शॉर्ट सर्किट होऊन घराला आग लागण्याची घटना घडलीये. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र घरमालकाच्या कष्टाचे पैसे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेत. अग्निशमन दलाने वेळीत घटनास्थळी दाखल होत आझ विझवल्याने मोठ्या अनर्थ ठळला.

हेही वाचाः तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी आतापासूनच करा !

शॉर्ट सर्किट होऊन घराला आग

बाबल्या खळी-वरचा बाजार फोंडा इथे एका बंद घराने मंगळवारी सकाळी पेट घेतला. घराला सकाळी आग लागण्याचा प्रकार घडला. फ्रिजमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. सदर घर इराप्पा जुतापनवार यांच्या मालकीचं आहे. मंगळवारी सकाळी फ्रिजमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि काही मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं. सुदैवानं आग लागल्याचं निदर्शनास येताच इराप्पा यांनी किचनमधला सिलींडर बाहेर काढला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

घरमालकाच्या कष्टाचे पैसे आगीच्या भक्ष्यस्थानी

या आगीत जरी जिवीतहानी झालेली नसली, तरी इराप्पा यांनी काबाडकष्ट करून जमवलेली पुंजी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या दुर्घटनेत इराप्पा यांचं सुमारे दीड लाखांचं नुकसान झालंय. फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी येऊन आग विझवली. त्यामुळे परिसरातल्या इतर घरांना आगीची झळ बसली नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!