सासष्टी तालुक्यात सर्वाधिक ५१२ मुंडकार खटले प्रलंबित

राज्यात १,८६९, तर बार्देशात ४५० प्रकरणे न्यायाच्या प्रतीक्षेत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: गोव्यातील रहिवाशांना घरांचे मालकी हक्क देण्यासाठी भूमी अधिकारिणी विधेयक नव्याने मांडण्याचा सरकारचा विचार आहे. त्यापूर्वी रहिवाशांना घरांचा अधिकार देण्यासाठी असलेल्या मुंडकार कायद्याखालीही राज्यात अद्याप १,८६९ अर्जदारांचे खटले प्रलंबित आहेत. सासष्टी तालुक्यात सर्वाधिक ५१२ खटले प्रलंबित आहेत. सर्व तालुक्यांत खटले प्रलंबित आहेत.
विधानसभा अधिवेशनात लेखी उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.

हेही वाचाः पुरामुळे धारबांदोड्यात दोन कोटींचं नुकसान

कुठे किती खटले प्रलंबित?

मुंंडकारांचे काही खटले मामलेदार न्यायालयात, तर काही खटले उपजिल्हाधिकारी न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यातील काही खटले दहा वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत. सासष्टी तालुक्यात ४५२ खटले मामलेदार न्यायालयात, तर ३० खटले उपजिल्हाधिकारी न्यायालयात आहेत. उपजिल्हाधिकारी न्यायालयात सत्तरीचा एकही खटला प्रलंबित नाही. डिचोलीत १० खटले मामलेदार न्यायालयात, तर २२ खटले उपजिल्हाधिकारी न्यायालयात प्रलंबित आहेत. तिसवाडीत २९९ पैकी २८६ मामलेदार वा जोड मामलेदार न्यायालयात, तर १३ खटले उपजिल्हाधिकारी न्यायालयात प्रलंबित आहेत. बार्देशात २९६ खटले मामलेदार न्यायालयात, तर १५४ खटले उपजिल्हाधिकारी न्यायालयात प्रलंबित आहेत. पेडण्यात १६ उपजिल्हाधिकारी न्यायालयात तर १४५ मामलेदार न्यायालयात प्रलंबित आहेत. केपे तालुक्यात २६ खटले मामलेदार न्यायालयात, तर १४ खटले उपजिल्हाधिकारी न्यायालयात प्रलंबित आहेत.

हेही वाचाः आसगाव, हणजूण येथे ड्रग्ज जप्त

काणकोणात १३ खटले उपजिल्हाधिकारी न्यायालयात, तर २५ खटले मामलेदार न्यायालयात प्रलंबित आहेत. मुरगावात २९ उपजिल्हाधिकारी न्यायालयात, तर ९३ मामलेदार न्यायालयात प्रलंबित आहेत. नव्याने स्थापन झालेल्या धारबांदोडा तालुक्यात २ मामलेदार न्यायालयात, तर ४ खटले उपजिल्हाधिकारी न्यायालयात प्रलंबित आहेत. सांगे तालुक्यात उपजिल्हाधिकारी कार्यालयात एकही खटला प्रलंबित नाही. मामलेदार न्यायालयात ३१ खटले प्रलंबित आहेत. फोंडा तालुक्यात १२९ खटले मामलेदार न्यायालयात, तर ३० खटले उपजिल्हाधिकारी न्यायालयात प्रलंबित आहेत. उपजिल्हाधिकारी न्यायालयाच्या तुलनेत मामलेदार न्यायालयात अधिक खटले प्रलंबित आहेत.

हेही वाचाः फोडाफोडीला सुरुवात! भाजपच्या माजी मंत्र्यांचा आपमध्ये प्रवेश

तालुका प्रलंबित खटले

सासष्टी ५१२
काणकोण ३८
मुरगाव १२२
केपे ४०
सांगे ३१
धारबांदोडा ०६
फोंडा १५९
सत्तरी ०७
डिचोली ३२
तिसवाडी २९९
बार्देश ४५०
पेडणे १६१

हा व्हिडिओ पहाः Video | FREE INTERNET BY ARLEKAR | कोरगावात कमळेश्वर हायस्कूलमध्येही प्रवीण आर्लेकर यांचं मोफत वायफाय

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!