‘हा’ प्रकार म्हणजे बालिशपणाचा कहर

सदानंद शेट तानावडे ; पक्षाचा उमेदवारांवर विश्वास नाही तर मतदारांनी उमेदवारांवर कसा विश्वास ठेवावा?

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोव्यात सत्तेवर येण्यासाठी निवडणुकीत उतरलेल्या कॉंग्रेस पक्षाचा स्वतःच्या उमेदवारावर विश्वास नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या उमेदवारांना मंदिर, चर्च आणि मशीदी मध्ये नेऊन आपण पक्ष सोडणार नाही अशी शपथ घेण्यास लावली. हा प्रकार म्हणजे बालिशपणाचा कहर आहे. काँग्रेस पक्षाचा त्यांच्या उमेदवारावर जर विश्वास नाही तर मतदारांनी त्यांच्या उमेदवारांवर कसा विश्वास ठेवावा? आणि आपले मत त्यांना का द्यावे? असा प्रश्न भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचाःफूट पाडणाऱ्यांच्या विरोधात लढूया

भाजपचे नेते उपस्थित

पणजी येथील भाजपाच्या प्रचार कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सदानंद शेट तानावडे बोलत होते. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते केशव उपाध्ये, महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी खासदार एडवोकेट नरेंद्र सावईकर उपस्थित होते.

हेही वाचाःदत्ता खोलकरांविरुद्ध आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा

गोव्याच्या इतिहासात कधीही असे घडले नव्हते

भाजपवर नेहमीच धर्मांध, जातीयवादी पक्ष म्हणून आरोप करणाऱ्या काँग्रेसचे असली रूप लोकांसमोर आले आहे. धर्माचे आणि जातीचे राजकारण करून निवडणूक जिंकण्याचा त्यांच्या प्रयत्नांना आता लोक भुलणार नाहीत. स्वतःच्या उमेदवारावर निवडणुकीपूर्वी अविश्वास दाखवणे यासारखा हास्यास्पद प्रकार नाही. आणि आतापर्यंत गोव्याच्या इतिहासात कधीही असे घडले नव्हते.

हेही वाचाः संदीप वझरकर यांची जामिनावर सुटका

पक्षनेतृत्वावर त्यांच्या आमदारांचा विश्वास नसल्याचे स्पष्ट

मागील निवडणुकीत काँग्रेसचे १७ आमदार निवडून आले. त्यातील फक्त दोन आमदार त्यांच्या सोबत आहेत. त्यावरून पक्षनेतृत्वावर त्यांच्या आमदारांचा विश्वास नसल्याचे स्पष्ट होत आहे. आपल्या उमेदवारांना धार्मिक स्थळांना घेऊन जाऊन त्यांच्याकडून शपथा घेणे हा वाईट पायंडा काँग्रेसने घातला आहे. असेही तानावडे यावेळी म्हणाले.

हेही वाचाः मुलींना चुलत भावांपेक्षा जास्त मालमत्ता मिळणार…

विकासाचे आणि समृद्धीचे सरकार पुन्हा एकदा गोव्यात आणावे

जर पक्ष स्वताच्या उमेदवार विश्वास ठेवत नसेल तर मतदार तरी विश्‍वास कसा दाखवतील ? असा प्रश्‍न उपस्थित करून मतदारांनी या प्रकारणी गंभीरपणे विचार करावा आणि काँग्रेसला मत न देता भाजपला मते द्यावीत. विकासाचे आणि समृद्धीचे सरकार पुन्हा एकदा गोव्यात आणावे. असे आवाहनही यावेळी तानावडे यांनी केले. भाजपाचा प्रचार कार्याला जोर आलेला आहे. भाजपाचे उमेदवार घरोघरी प्रचार करत आहेत. त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने येत्या निवडणुकीत भाजपाचे सरकार बहुमताने निवडून येईल यात तिळमात्र शंका नसल्याचे तानावडे म्हणाले.

हेही वाचाः कारची झाडाला धडक बसल्याने अपघात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!