गोंयकारांनी कर्नाटक आणि केरळमध्ये रा. स्व. संघाचा पाया घातला

प्राचार्य डॉ. भूषण भावे यांचं प्रतिपादन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः पोर्तुगिजांच्या धर्मांतरणामुळे स्थलांतरित झालेल्या गोमंतकियांनी कर्नाटक आणि केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाया घातला, असं प्रतिपादन प्राचार्य डॉ. भूषण भावे यांनी केलं आहे. प्रा एल श्रीधर भट यांच्या ‘भटकंती’ या कोंकणी आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

हेही वाचाः शिवोलीतील ‘त्या’ मृत रशियन मुलीचा चेन्नईतील फोटोग्राफरकडून लैंगिक छळ

22 ऑगस्ट रोजी मडगावात प्रकाशन

प्रख्यात लेखक आणि विचारवंत उदय भेंब्रे यांच्या हस्ते रविवार 22 ऑगस्ट रोजी मडगावात या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. 95 वर्षं वयाचे प्रा. श्रीधर भट यांनी या आत्मचरित्रातून कुमारवयात वयाच्या पंधराव्या वर्षी गोव्यातून कर्नाटकात स्थलांतर केल्यानंतर भोगलेल्या हालअपेष्टांचं तसंच सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर केलेल्या संघर्षांचं अनुभवकथन केलं आहे. तसंच महात्मा गांधीची हिंदी प्रचार सभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्याचंही वर्णन यात आहे.

संघ परिवाराचा पाया गोंयकारांनी घातला

या पुस्तकावर बोलताना डॉ. भावे म्हणाले, संघ परिवाराचा पाया कर्नाटकमणे कन्नडियाने या केरळमध्ये मल्याळीने घातलेला नाही, तर तो शेकडो वर्षांपूर्वी गोव्यातून स्थलांतर केलेल्या गोंयकारांनी घातलेला आहे. याचं उदाहरण देताना त्यांनी केरळमधील कार्यातून अखिल भारतीय पातळीवर बौद्धिक प्रमुख झालेल्या कोंकणी गोड सारस्वत ब्राह्मण परिवारातील रंगा हरीचा आवर्जून उल्लेख केला. तेच कार्य श्रीधर भट सारख्या कित्येक कोकणी लोकांनी कर्नाटकातही केलं आहे असंही ते म्हणाले.

हेही वाचाः एक भलामोठा Thank You! तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत..

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना उदय भेंब्रे यांनीही कोकणी लोकांनी कर्नाटकातील कन्नड भाषा आणि साहित्यापासून उद्योग, बँकिंग ते आजच्या माहिती तंत्रज्ञानापर्यंतच्या क्षेत्रात केलेल्या अभूतपर्व कामगिरीचा उल्लेख केला.

हेही वाचाः मोरजीत महिलांनी झाडाला बांधला राखीचा धागा

स्वतःच्या कोकणी अस्मितेशी पूर्णतया प्रामाणिक राहून स्थलांतरित झालेल्या राज्यातील संस्कृतीशी कोकणी माणूस एकरूप झाला. ही भारतभर पसरलेल्या 40 लाख कोकणी लोकांची खासियत आहे, असंही ते म्हणाले. या कार्याचे दाखले देताना त्यांनी कर्नाटकातील कोकणी भाषिक आणि कन्नड कवी मंजेश्वर गोविंद पै आणि कन्नड भाषाशास्त्रज्ञ पंजे मंगेश रावापासून गिरीश कर्नाड, जयंत कायकिणी ते विवेक शानभाग यांचा उल्लेख केला.

हेही वाचाः कोलवाळध्ये 1.310 किलो गांजा जप्त

याप्रसंगी सन्माननीय अतिथी आणि कोंकणी भाषा मंडळाच्या अध्यक्ष अन्वेषा सिंगबाळ आणि स्वतः मूळ लोलये-काणकोण आणि जांबावलीचे लेखक श्रीधर भट यांनीही आपले विचार मांडले. तसंच व्हिडियोतून पुस्तकावर पाठविलेल्या प्रतिक्रियाही दाखवण्यात आल्या. यात सहभाग होता डॉ. कस्तुरी मोहन पै आणि गुरुदत्त बाळिगा (मंगळूर), गोकुळदास पै (केरळ) तसंच गोव्यातील श्रीधर कामत बांबोळकार, देविदास कदम आणि नमन सावंत धावस्कार यांचा.

हेही वाचाः टाटाच्या सर्वात स्वस्त Micro SUV चं ‘हे’ नाव ठरलं…

संजना पब्लिकेशनच्या वतीने दिनेश मणेरीकर यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. कार्यक्रमाची सुरुवात भट यांची द्वितिय कन्या लक्ष्मी पै यांच्या थेट ऑस्ट्रेलियातून केलेल्या प्रार्थनेनं झाली. त्यांची जेष्ठ कन्या डॉ. आशा राव यांनी कोइमतूरहून आभार प्रदर्शन केलं.

हेही वाचाः काबूल विमानतळावर हल्लेखोर आणि अफगाण सुरक्षा दलांमध्ये चकमक

प्रशांती तळपणकर आणि उर्वी भट यांनी सूत्रसंचालन केलं.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | Murder Case Solved | Crime | Goa Police | रेती व्यानसायिकाच्या हत्येचा अखेर छडा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!