मोले अभयारण्य क्षेत्रातील ३ मेगा प्रकल्पांसाठी सरकारचं लँड एक्विझिशन प्रक्रिया पूर्ण चुकीची

पर्वरीचे आमदार रोहन खंवटेंनी सरकारवर हल्लाबोल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः विधानसभेच्या 3 दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आज सकाळी 11 वाजता सुरुवात झालीये. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोले अभयारण्य क्षेत्रातील ३ मेगा प्रकल्पांसाठी सरकारचं लँड एक्विझिशन प्रक्रिया पूर्ण चुकीची म्हणत पर्वरीचे आमदार रोहन खंवटेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय.

हेही वाचाः बोल बिनधास्त | मोले अभयारण्यातील प्रकल्प घातक ठरणार?

नक्की काय म्हणालेत खंवटे?

मोले अभयारण्य क्षेत्रातील ३ मेगा प्रकल्पांसाठी सरकारचं लँड एक्विझिशन प्रक्रिया पूर्ण चुकीची आहे, असं खंवटेंनी म्हटलंय. त्याचप्रमाणे यातील कायदेशीर प्रक्रिया झालेलीच नसल्याचंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलंय.सीईसीचा अहवाल सरकार मान्य करणार का? असा सवाल करत रोहन खवंटेनी जवळजवळ सरकारवर हल्लाबोल केलाय.

हेही वाचाः रेल्वे मार्ग दुपदरीकरण नक्की कशासाठी?

महसूल मंत्र्यांची ढोबळ उत्तर

खंवटेंनी विचारलेल्या प्रश्नांवर महसूल मंत्र्यांनी वरवरची उत्तर दिली आहेत. त्यांची ढोबळ उत्तरं ऐकून विरोधकांचा सरकारवर हल्ला केला. तसंच विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्यास सरकार टाळाटाळ करतय आसा आरोपही विरोधकांनी सरकारवर केलाय. मोलेतील प्रकल्पांवर अर्ध्या तासाच्या चर्चेची रोहन खंवटे, विजय सरदेसाई तसंच दिगंबर कामतांनी मागणी केलीये.

हा व्हिडिओ पहाःVideo | Uncut | विधानसभेतला राडा | साल्ढाणांचा भाजपचा घरचा आहेर आणि विरोधकांचा गदारोळ

प्रकरण काय?

गोव्यात सध्या तीन प्रकल्पांवरून लोकांनी रान उठवलंय. दक्षिण-मध्य रेल्वे दुपदरीकरण, मोले अभयारण्य क्षेत्रातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आणि गोव्याला अखंडीत आणि शाश्वत वीज पुरवठ्यासाठी नियोजन केलेला गोवा तमनार प्रकल्प. या तीन्ही प्रकल्पांचा संबंध कोळसा वाहतूकीशी लावून त्याविरोधात जनक्षोभ भडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोले अभयारण्य क्षेत्रात होणारा वृक्षसंहार आणि नियोजित कोळसा वाहतूकीमुळे होणारे प्रदूषण हे विषय पुढे रेटून या प्रकल्पांना विरोध सुरू आहे. विरोधकांचे सगळेत युक्तीवाद अगदीच नाकारण्यासारखे नाहीत परंतु असंबंध युक्तीवाद करून सुक्याबरोबर ओलेही जाळले जाण्याचा प्रकार इथे घडतोय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!