लोहिया मैदानावरील हुतात्मा स्मारक २४ तासात सुरक्षित स्थळी हलवा, अन्यथा…

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांचा सरकारला इशारा

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगावः गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील निर्लज्ज भाजप सरकारला गोवा मुक्तीसाठी सर्वस्व दिलेल्या हुतात्म्यांबद्दल तसंच स्वातंत्र्यसैनीकांबद्दल आदर नाही. लोहिया मैदानावरुन गायब झालेला डॉ. लोहियांचा पुतळा काल कंत्राटदाराच्या गोदामात सापडला. दुर्देवाने तेथील हुतात्मा स्मारक मात्र लोहिया मैदानावरच आजही उघड्यावर टाकून दिल्याचं आढळून आलंय. सरकारने जर सदर हुतात्मा स्मारक येत्या २४ तासांत सुरक्षित स्थळी हलवलं नाही, तर काँग्रेसचे कार्यकर्ते हे पुण्यकार्य करतील, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांना दिलाय.

भाजप सरकारकडून स्वातंत्र्यसैनिकांचा वारंवार अपमान

भाजप सरकार गोव्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलेल्या स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांचा वारंवार अपमान करत आहे. भाजपचं बेगडी देश प्रेम यातून उघड होत आहे, असं चोडणकर म्हणाले. लोहिया मैदानावरील पुतळा तसंच हुतात्मा स्मारक आणि तेथील ऐतिहासीक नामफलक हे केवळ अधिकृत आणि तज्ञांच्या देखरेखीखाली तसंच स्वातंत्र्यसैनिकांच्या मार्गदर्शनाखाली हाताळणं गरजेचं आहे, असं चोडणकरांनी सांगितलं.

आज दिवाळखोर झालेलं भाजप सरकार ऐतिहासीक दस्तऐवज, पुतळे तसंच स्मारके क्रोनी क्लबला विकण्यासही मागे पुढे पाहणार नाही, असा टोला चोडणकरांनी लगावलाय.

हा व्हिडिओ पहाः Leophard & Cat | बिबट्या आणि मांजर विहिरीत पडल्यानंतर काय झालं?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!