राज्यातील कोविड मृत्यूंसाठी सरकारच जबाबदार

पर्वरीचे आमदार रोहन खंवटेंची टीका; सरकारची दिरंगाई नडली

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यातील कोरोना रुग्णवाढीची चिंता कायम आहे. राज्याच्या पॉझटिव्हीटी रेट जरी 90 च्या वर असला तरी होणारे मृत्यू ही अजूनही तेवढीच चिंतेची बाब आहे. अजूनही दिवसाला 22 ते 25 लोक कोरोनाचे बळी ठरत आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंसाठी सरकारच जबाबदार असल्याची टीका पर्वरीचे आमदार रोहन खंवटेंनी केलीये. याविषयी ट्विट करत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीये.

हेही वाचाः मुरगाव तालुक्यासाठी पूर्णवेळ क्षेत्रीय कृषी कार्यालय सुरू करा

रोहन खंवटेंचं ट्विट

सरकारवर दोषारोप करताना पर्वरीचे आमदार रोहन खंवटेंनी ट्विट केलंय. ट्विट करताना खंवटे म्हणालेत, आज गोवा सरकारमुळे 20 हून अधिक गोंयकार कोविडचे बळी ठरत आहेत. कोविड निर्बंध लागू करण्यात सरकारने केलेला उशिर, पर्यटकांना येण्यासाठी खुल्या ठेवलेल्या सीमा आणि हॉस्पिटल्समध्ये बेड, ऑक्सिजन इ. सुविधा देण्यात सरकारला आलेलं अपयश, या सगळ्यामुळे राज्यात कोविडचं थैमान सुरू आहे.

अजूनही सरकारला कोविडचं गांभिर्य नाही

लवकरच कोविडची तिसरी लाट येणार असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. ही तिसरी लाट पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा घातक असणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने एवढ्या निरपराध गोंयकारांचे प्राण हिरावून नेले. कोविड किती घातक आहे याची कल्पना असूनही सरकारने या लाटेपासून वाचण्यासाठी काहीच पूर्वतयारी केली नाही. आता तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी तयारी करत असल्याची घोषणा सरकारने केली आहे. पण ही फक्त घोषणा आहे, कारण त्या दृष्टीने कोणतीच कृती होताना दिसत नाहीये, असं खंवटे म्हणालेत.

हेही वाचाः वांते पिळयेवाडा रस्त्याची मागणी अखेर पूर्ण

बुधवारची राज्याची कोविड आकडेवारी

बुधवारी राज्यात एकूण 706 नव्या रुग्णांची भर पडली. तर एकूण 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, एकूण 3 हजार 715 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

हेही वाचाः CORONA UPDATE | रुग्ण बरे होण्याचा दर 91.40 टक्क्यांवर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!