‘विद्याभारती-गोवा’ शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट…

शिष्टमंडळाने केलेल्या सूचना अवश्य विचारात घेऊ : मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : विद्याभारती- गोवा या शैक्षणिक संघटनेच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष डाॅ. सीताराम कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांची महालक्ष्मी बंगला, आल्तीनो या ठिकाणी भेट घेतली. प्राचार्य सुभाष वेलिंगकर, प्राचार्य गजानन मांद्रेकर व माधव केळकर यांचा समावेश या शिष्टमंडळात होता. गोवा सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी पूर्व-प्राथमिक स्तरापासून करण्याचे निश्चित केल्याच्या पार्श्वभूमीवर, शिक्षणतज्ज्ञ सदस्यांच्या विशेष चिंतन बैठकीतून या अंमलबजावणीसाठीच्या पूर्ण नियोजनाचे तयार केलेले मार्गदर्शक प्रारूप, शिक्षणमंत्रीपद सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांना या भेटीत सादर करण्यात आले.
हेही वाचा:शिक्षण क्षेत्रातील वारसा जपण्यास सावंत सरकार अपयशी…

अडचणी आणि उपाययोजना अशा वस्तुनिष्ठ मार्गदर्शक तत्वांचा समावेश

प्रत्यक्ष गोवा राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन नवीन शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी कार्यवाहीसाठी नेमके काय करावे लागेल, सर्व शैक्षणिक प्रशासकीय यंत्रणांची कशा प्रकारे अनुकुल पुर्नरचना व सक्षमीकरण करावे लागेल, विविध शैक्षणिक वर्ग-स्तरांच्या टप्प्यांची पुर्नरचना करताना येणारे अडथळे व उपाय, शालेय परिवार( स्कूल- काँप्लेक्स) यंत्रणा सुदृढ व सक्षम करून, धोरण राबविण्याच्या कामी तिची भूमिका काय रहावी लागेल; पूर्व-प्राथमिक शाळांचे नियमितीकरण, सुसूत्रीकरण, अनुरुप समान अभ्यासक्रमाची सूत्रे काय असावी लागतील, अडचणी आणि उपाययोजना अशा अनेक वस्तुनिष्ठ मार्गदर्शक तत्वांचा समावेश, आज मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या मार्गदर्शिका-दस्तऐवजात करण्यात आलेला आहे.
हेही वाचा:250 चे तिकीट 500 ते 800 रूपये; लॉटरी तिकिटांंची ब्लॅकमध्ये विक्री…

“विद्याभारती-गोवा” शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यानी दिले आश्वासन

सरकारी प्राथमिक शाळा बंद करण्याचा सरकारचा अजिबात इरादा नाही असेही शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या या संदर्भातील प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नवीन शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीत “विद्याभारती-गोवा” शिष्टमंडळाने केलेल्या सूचना अवश्य विचारात घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यानी विद्याभारती-गोवा-शिष्टमंडळाला दिले.
हेही वाचा:अटल सेतूवरील लाखोंचे वीज साहित्य चोरीला…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!