चतुर्थीत नवे बाधित मिळण्याचे प्रमाण कमी

दिवसाला रुग्ण बरे होण्याचं प्रमाण नव्या रुग्णांपेक्षा अधिक

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: गर्दीमुळे चतुर्थीच्या काळात करोना रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती; मात्र ती फोल ठरताना दिसत आहे. सप्टेंबरमध्ये चतुर्थीपूर्वी दिवसाला मिळणाऱ्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत चतुर्थी उत्सवात रुग्ण मिळण्याचं प्रमाण खूपच कमी झालं आहे.

हेही वाचाः तब्बल 65 कुटुंबांचा एकच ‘बाप्पा’…700 वर्षांची परंपरा !

चतुर्थीच्या तीन दिवसांत ११२ रुग्ण मिळाले

चतुर्थीच्या तीन दिवसांत ११२ रुग्ण मिळाले, तर चतुर्थीपूर्वी नऊ दिवसांत ७७० रुग्ण मिळाले होते. सरासरीचा विचार करता चतुर्थीपूर्वी सप्टेंबरात दिवसाला ८५.५५ रुग्ण मिळाले. चतुर्थीच्या काळात हे प्रमाण ३७.३३ आहे. चतुर्थीपूर्वी बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवे रुग्ण मिळण्याचे प्रमाण अधिक होते. चतुर्थीच्या काळात दिवसाला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नव्या रुग्णांपेक्षा अधिक आहे.

मे आणि जूनच्या तुलनेत ऑगस्टमध्ये रुग्ण मिळण्याचं प्रमाण घटलं

मे आणि जूनच्या तुलनेत ऑगस्टमध्ये रुग्ण मिळण्याचं प्रमाण घटलं आहे. सप्टेंबरमध्ये ते आणखी कमी झालं. सप्टेंबरच्या सुरुवातीला दिवसाला ८०हून अधिक रुग्ण मिळत होते. चतुर्थीपूर्वी एके दिवशी पाच बाधित दगावले होते. त्यामुळे भीती वाढली होती. चतुर्थीच्या दोन दिवसआधी पाऊस असतानाही बाजारात गर्दी पहायला मिळाली. गणेेेशोत्सवातील तीन दिवस पूर्ण झाले आहेत. करोनामुुळे अनेकांनी उत्सव दीड दिवसांचाच साजरा केला. या तीन दिवसांत पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला सक्रिय बाधितांची संख्या ८७७ होती. आता ती संख्या ७३८ वर आली आहे. मागील तीन दिवसांत कमी बाधित मिळाल्याने सक्रिय बाधितांचा आकडा कमी झाला आहे.

१ ते ९ सप्टेंबर काळातील स्थिती

नवे रुग्ण – ७७०
बरे झालेले रुग्ण – ७५८
बळी – ११
रुग्ण मिळण्याचे दिवसाचे प्रमाण – ८५.५५
बरे होण्याचे सरासरी प्रमाण – ८४.२२

१० ते १२ सप्टेंबर काळातील स्थिती

नवे रुग्ण – ११२
बरे झालेले – २४७
बळी – ५
रुग्ण मिळण्याचे दिवसाचे प्रमाण – ३७.३३
बरे होण्याचे सरासरी प्रमाण – ८२.३३

हा व्हिडिओ पहाः POT HOLES | आंदोलनाचा इशारा देताच कामाला सुरुवात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!