सांगेतील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाची पायाभरणी ‘या’ तारखेला

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा पुनरुच्चार; विरोध करणाऱ्यांना मागे हटण्याचाही दिला सल्ला

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सांगेतील पाईक देव देवस्थानाच्या नवीन मंदिराची पायाभरणी केली. यावेळी उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक आणि मंत्री सुभाष फळदेसाईही उपस्थित होते.

येत्या सहा महिन्यात आयआयटीची पायाभरणी

येत्या सहा महिन्याच्या आत आयआयटीचीही पायाभरणी केली जाणार असल्याची घोषणा डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. या प्रस्तावित आयआयटी तसेच गोव्यात येणाऱ्या इतर प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गोव्यात लोकांना सरकारी जमीन हडपण्याची सवय

गोव्यात लोकांना सरकारी जमीन हडपण्याची सवय लागली आहे. जर एखाद्याने सरकारी जागेवर घर बांधलं असेल आणि बरीच वर्ष राहात असेल तर सरकार म्हणून आम्ही त्याला ती जागा देण्यास तयार आहोत. एखाद्याचं घर मुद्दामहून मोडून त्याजागी प्रकल्प आणणार नाही. उलट त्याला सरकार जेवढ्यास तेवढी जमीन देण्यासही तयार आहे. मात्र परिसरात चुकीचा संदेश पसरवत तेढ निर्माण करणं चुकीचं आहे. जर या जागेत एखादं कोपेल असेल तर तेही ख्रिस्ती बांधवांना सन्मानपूर्वक दिलं जाईल. या प्रकल्पाचं राजकारण होऊ नये यासाठी स्थानिकांनी पुढाकार घ्यावा आणि आयआयटीचा मार्ग मोकळा करावा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

हेही वाचाःPhoto Story | प्रुडंट मीडियाचा सोळावा वर्धापनदिन सोहळा…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!