नव्या राजभवनाची पायाभरणी; ३० रोजी राष्ट्रपती गोव्यात

मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांसह ३५ जणांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे गोवा घटक राज्य दिनाच्या सोहळ्यात (३० मे रोजी) विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यादिवशी राष्ट्रपती राजभवनातील नवीन  इमारतीची पायाभरणी करतील. माजी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांसह ३५ जणांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचाःबारावीचा निकाल जाहीर ; मुलींनी मारली बाजी…

‘आदिवासी प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार

२५ मे रोजी आदिवासी कल्याण विभागातर्फेही ‘प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येणार आहे. मिनेझिस ब्रागांझा सभागृहात सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. आदिवासी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘आदिवासी प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, आमदार गणेश गावकर उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचाःसरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच ‘ही’ योजना…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!