३०० गरोदर महिलांनी घेतला कोविड लसीचा पहिला डोस

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या गेल्या तीन महिन्यांनंतर एक हजाराच्या आत (९९२) आली आहे. त्यामुळे कोरोनाचे संसर्गावर नियंत्रण ठेवण्यास सरकारला यश आलं आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत असून ते ९७.५८ टक्क्यांवर पोहचलं आहे, तर पॉझिटिव्हिटीचं प्रमाण २.०७ टक्के आहे. लसीकरणाबाबतही लोकांमध्ये जागृती होत असून आतापर्यंत सुमारे ३०० गर्भवर्तीनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे.
हेही वाचाः सरकारी योजना आता घरबसल्या एका क्लिकवर
राज्यात सुमारे २० हजार गर्भवती महिला
राज्यात सुमारे २० हजार गर्भवती महिला आहेत. काही डॉक्टर गरोदर महिलांना योग्य सल्ला देत नाहीत, त्यामुळे या महिला लस घेण्यासाठी पुढे येत नाहीत. तर काहीजणी लस न घेण्यावर अडून असल्याने आरोग्य यंत्रणाही हतबल आहे. या असहकार्यामुळे राज्यात १०० टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण होऊ शकणार नाही, अशी माहिती भाजपच्या आरोग्य सल्लागार समितीचे डॉ. शेखर साळकर यांनी सांगितलं.
हेही वाचाः करोनातून बरे झालेल्या ४१ नागरिकांचा मृत्यू
आरटीपीसीआर चाचणी करूनच राज्यात प्रवेश द्यावा
राज्यात प्रवेश करणारा प्रत्येक व्यक्ती कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली असावी किंवा आरटीपीसीआर चाचणी करून त्याला प्रवेश द्यावा. जर गोव्यात येणाऱ्या व्यक्तीसोबत २ वर्षांचं मूल असेल आणि त्याला ताप येत असेल तर आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी लागेल, असं साळकर म्हणाले.
हेही वाचाः ट्यूशन, जिमखाना, कल्चरल शुल्क 50 टक्के माफ
गेल्या 24 तासांच नवीन ९७ कोरोना रुग्णांची नोंद
आरोग्य संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांत मडगाव येथील ६४ वर्षीय कोरोनाबाधित रुणाचा मृत्यू झाला आहे, तर नवीन ९७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या ३,१५७ वर पोहचली आहे. विविध आरोग्य केंद्रांवर ४६८५ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील १७ जणांना हॉस्पिटलात दाखल करण्यात आले तर ८० जणांनी होम आयसोलेशनमध्ये राहणं पसंत केलं आहे. १३३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील विविध आरोग्य केंद्राच्या कक्षेत राहणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्याही ५० च्या खाली आली आहे.