खासगी बस व्यावसायिकांची आर्थिक स्थिती बिकट

डिझेल अनुदानावरील पैशांचं वितरण करा; खासगी बस मालक संघटनेची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः सध्या करोना महामारीच्या काळात खासगी बस व्यवसायिकांची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमोडली आहे. सरकारने या बस व्यवसायिकांसाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेल्या अनुदानाची रक्कम या व्यावसायिकांना द्यावी, अशी मागणी खासगी बस मालक संघटनेचे अध्यक्ष सुदिप ताम्हणकर यांनी केली आहे.

हेही वाचाः बिबट्याच्या बंदोबस्तासाठी खास पथक तैनात

खासगी बस व्यवसाय डबघाईत

सध्या करोनामुळे खासगी बस वाहतूक व्यवसाय पूर्णपणे डबघाईत चाललाय. गेल्या अर्थसंकल्पात सरकारने या व्यवसायिकांच्या डिझेलवरील तसंच बस विम्यावरील अनुदानाचे पैसे देण्यासाठी सुमारे 18 कोटींची तरतूद केली होती. सरकारने ते पैसे खासगी बस व्यवसायिकांना द्यावेत. यासाठी आम्ही वाहतूक खात्याला निवेदन दिलं आहे. सध्या सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसल्यानं आम्ही खासगी बसमालकांनी आर्थिक मदतीची मागणी केली नाही. पण आमचा जो कायदेशीर पैसा आहे तो तरी सरकारने या खासगी बस व्यवसायिकांना द्यावा,  असं ताम्हणकर म्हणालेत.

हेही वाचाः भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यामध्ये ‘सजग’ गस्ती जहाज सामील

डिझेलात भरमसाठ वाढ

अगोदर 67 रुपये डिझेल होतं, त्यात आता वाढ होऊन 90 रुपये झालंय. अशा स्थितीत 50 टक्के प्रवासी घेऊन बस चालवणं बस व्यवसा​यिकांना परवडणारं नाही. डिझेलेच्या वाढत्या किंमतीचा फटका या व्यवसाला बसला आहे. सरकारने करोना काळात 50 टक्के प्रवासी घेऊन बसेस सुरू ठेवण्यास सांगितलं आहे, जे परवडणारं नसल्यानं अनेक खासगी बस व्यवसायिकांनी आपला व्यवसाय बंद ठेवला आहे. राज्यात सुमारे 1460 खासगी बसेस आहेत. त्यामुळे यात काम करणारे चालक, वाहक यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. याचा विचार सरकारने करून आमच्या कायदेशीर पैशांचं वितरण  करावं,  अशी मागणी ताम्हणकरांनी केलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!