फरार कैदी अखेर बंगळुरुत सापडला

२२ सप्टेंबर २०१० साली केलं होतं पलायन; आंध प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू पोलिसांची संयुक्त मोहीम

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: कोलवाळच्या तुरुंगातून पलायन केलेल्या बलात्काराच्या प्रकरणातील यल्लाप्पा रामचंद्र (तामिळनाडू) या कैद्याला बंगळूर पोलिसांनी अटक केलीये. लवकरच त्याला गोव्याच आणलं जाणारेय. त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन दोनदा यापूर्वी पलायन केलं होतं.

हेही वाचाः कोरोनाला अटकाव करत पर्यटन क्षेत्र सुरू राहणं गरजेचं

२०१० च्या २२ सप्टेंबरला झाला होता फरार

कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहातून रामचंद्र यलाप्पा २०१० च्या २२ सप्टेंबरला फरार झाला होता. बंगळुरू येथे शक्रवारी रात्री पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. म्हापसा पोलीस तसंच गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांच्या पथकांनी आंध प्रदेश, कर्नाटक, तसंच तामिळनाडू या तीन राज्यांत त्याला ताब्यात घेण्यासाठी संयुक्त मोहीम हाती घेतली होती. शेवटी त्याला बंगळूरू येथून ताब्यात घेण्यात आलंय. त्याला ताब्यात घेण्यासाठी अनेकवेळा प्रयन करण्यात आले. शेवटी उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारावर त्याला कर्नाटकातील हॉस्पेट येथून ताब्यात घेण्यात आलंय.

हेही वाचाः स्कूटीचा अपघात, एक जागीच ठार, दुसरा गंभीर जखमी

ब्रिटिश महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप

काणकोण तालुक्यातील पाळोळे समुद्र किनाऱ्यावर उतरलेल्या एका ३७ वर्षीय ब्रिटिश महिलेवर बलात्कार करुन तिचं साहित्य लुटल्याच्या आरोप रामचंद्र यलाप्पावर आहे. रामचंद्र यल्लाप्पाला मडगाव रेल्वे स्थानकावरुन गोव्यातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना २० डिसेंबर २०१८ रोजी अटक करण्यात आली होती. कारागृहातून संशयित दुसऱ्यांदा पळून गेला होता. यापूर्वी मडगावातील न्यायालयात सुनावणीस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पहिल्यांदा पलायन केलं होतं. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ च्या दरम्यान कारागृहातील सुरक्षा रक्षकांचा डोळा चुकवून कारागृहातून नियोजित पद्धतीने पळ काढण्यात तो यशस्वी ठरला होता. कारागृहातील भिंतीवर चढून तेथून गटारात लपून राहिल्यानंतर तो पळून गेला. पळून जाण्यासाठी पावसाचा आधार घेतला होता. गोव्यातून नंतर त्यांने महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा असा प्रवास केला होता. प्रत्येकवेळी तो आपलं ठिकाण बदलत होता.

हेही वाचाः कणकवलीत झालं, करमळीत केव्हा होणार?

बंगळुरुतही वाँटेड

म्हापसा पोलिसांनी गुन्हा अन्वेषण विभागातील पोलिसांच्या सहकार्याने त्याला अटक केल्याची माहिती निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी दिली. अटक केल्यानंतर शनिवारी पहाटेच्या दरम्यान त्याला गोव्यात आणण्यात आलं. अनेक गुन्ह्यात त्याचा हात आहे. बंगळुरु येथील एका गुन्ह्यासाठी तो तेथील पोलिसांनाही हवाय.

हेही वाचाः ब्रेकिंग | राज्यात पुन्हा ५००पेक्षा जास्त नव्या रुग्णांचं २४ तासांत निदान

इतर गुन्यातही वाँटेड

ब्रिटिश महिलेवर बलात्कार प्रकरणाव्यतिरिक्त या आरोपीचा त्यापूर्वी मांद्रे येथे एका पर्यटक दाम्पत्याचे लाखो रुपयांचे दागिने लुटण्याच्या घटनेत हात असल्याचं उघड झालं होतं. मूळ तंजावर- तामिळनाडू येथील हा आरोपी चोरी करण्याच्या उद्देशाने गोव्यात आल्याचं उघड झालं.

हेही वाचाः नगरपालिकांचा रणसंग्राम | कुठे किती जणांनी अर्ज मागे घेतले? वाचा सविस्तर

गुन्हे शाखेसह म्हापसा पोलिसांची कारवाई

पूर्ण मोहिमेत गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक शोभीत सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आला. तसंच गोवा पोलिस अधीक्षक उत्कर्ष प्रसून, तसंच पीआय राहुल परब, अनंत गावकर, तुषार लोटलीकर, उपनिरीक्षक सुनील, किरण नाईक, स.उपनिरीक्षक विजय, हेड कॉ. उमेश, ईश्वर, हरिश्चंद्र पालेकर, विष्णू राणे, इर्शाद वाटंगे, कॉ. महाबळेश्वर सावंत, प्रकाश उत्कुरी, चालक सुदेश मठकर, अक्षय पाटील, सागर नाईक, बाप्तीश मस्करेन्हस या टीमने संशयितास पकडलं. पोलिसांच्या या कारवाईचं महासंचालकांनी अभिनंदन केलं असून त्यांना पारितोषिकसुद्धा जाहीर केलीत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!