एंटरटेन्मेंट सिटी प्रकल्प पर्यावरण, गोंय, गोंयकारपण संभाळून होईल

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांची माहिती; लोकांना विश्वासात घेऊन प्रकल्प करणार

मकबूल | प्रतिनिधी

पेडणे: मांद्रे येथे होणारा एंटरटेन्मेंट सिटी प्रकल्प पर्यावरण, गोंय आणि गोंयकारपण सांभाळून होईल. लोकांना विश्वासात घेउन हा प्रकल्प होईल. मात्र या प्रकल्पाला कुणी विरोध करू नये, असं उपमुख्यमंत्री तथा पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

हेही वाचाः मांद्रे गट काँग्रेसकडून समाजसेवेतून सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रयत्न

लोकांना त्रास होणार असं काहीही होणार नाही

हा प्रकल्प देशातील एक मोठा प्रकल्प आहे. त्यातून मांद्रे आणि पेडणे तालुक्यातील लोकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे मांद्रे, पेडणे तालुक्याचं नाव जगभर होइल. त्यापासून स्थानीकांना कसलाही त्रास होणार नाही. कळंगुटमध्ये ‘सनबर्न’सारखा कार्यक्रम होतो. लोक अशा कार्यक्रमाची मुद्दाम मागणी  करतात. अशा कार्यक्रमांतून राज्याला उत्पन्न मिळतं, हॉटेल्सचा व्यवसाय चांगला चालतो, छोटे छोटे व्यवसाय चालतात, लोकांना रोजगार मिळतो. लोकांना त्रास होणार असं काहीही होणार नाही, असं आजगावकर म्हणाले.

हेही वाचाः प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणाऱ्या नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदी

गोवा आम्हाला पुढे न्यायचा आहे

या प्रकल्पामुळे येथील चहुबाजूच्या विकासाला चालना मिळणार आहे. सध्या पेडणे तालुक्यातील किनारी भागात एकही फाईव्ह स्टार हॉटेल नाही. पण कुणाचा विरोध होऊ नये. गोवा आम्हाला पुढे न्यायाचा आहे. या भागाचे आमदार तथा गोवा पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे हे सर्वांना सोबत आणि विश्वासात घेऊन निश्चितपणे हा प्रकल्प मार्गी लावतील. रोजगार देण्यासाठी आणि विकास घडवून आणण्यासाठी आम्ही मोपा विमानतळ प्रकल्प आणला. शेतकऱ्यांनी त्यासाठी आपल्या जमिनी दिल्या. या अशा प्रकल्पामुळे पेडणे तालुक्यात रोजगार उपलब्ध होऊन तालुक्याचा विकास होणार आहे, असं आजगावकर म्हणाले.  

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!