अपघातातील मृत चालकाची ओळख पटली

चालक डोंगर मार्ग शिवोली बार्देश येथील

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे : ओशालबाग धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर उलटून एका दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला होता. यात दुचाकी चालक कंटेनरच्या मागील भागात अडकून जागीच ठार झाला. त्या ठार झालेल्या चालकाची शुक्रवारी पेडणे पोलिसांना ओळख पटली आहे.
हेही वाचाःकंटेनर उलटून दुचाकीला धडकल्याने एक ठार

चालक डोंगर मार्ग शिवोली बार्देश येथील

चालकाचे नाव रुडॉल्फ आंतोनिओ फर्नांडिस (वय ४८) असून तो डोंगर मार्ग शिवोली बार्देश येथील आहे. रुडॉल्फ फर्नांडिस पेडणे मार्गाहून धारगळ येथे जात असताना ओशबाग या ठिकाणी उलटलेल्या कंटेनरच्या मागील भागात अडकल्याने अर्धे शरीर रस्त्यावर तर, अर्धे शरीर कंटेनरच्या खाली सापडले. रात्री उशिरापर्यंत त्याची ओळख पटली नव्हती.
हेही वाचाःट्रक झोपडीवर उलटल्याने तीन लहान मुलींचा मृत्यू

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!