बुधवारपासून उत्तर गोव्यात १४४ कलम लागू

28 जुलै ते 30 जुलै 2021 रोजीपर्यंत तीन दिवसांचं पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काढला आदेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः उद्या बुधवार 28 जुलै ते 30 जुलै 2021 रोजीपर्यंत तीन दिवसांचं पावसाळी अधिवेशन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर गोव्यात 144 कलम लागू करण्यात आलं आहे. उत्तर गोवा जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांनी एका आदेशान्वये तसा आदेश काढला आहे, असं माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे कळवण्यात आलं आहे.

हेही वाचाः ‘सुपर डान्सर’ची खुर्ची गेली शिल्पाच्या हातून?

या आदेशानुसार उत्तर गोवा जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, चौक, गल्ली किंवा कोणत्याही खुल्या जागेत पाच किंवा अधिक व्यक्ती एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अग्नीअस्त्रे किंवा घातक शस्त्रे जवळ बाळगण्यासही परवानगी नाही. तसंच पर्वरी येथील विधानसभा संकुलाच्या सुमारे ५०० मीटर अंतराच्या आत तसंच पणजी पोलीस स्टेशनच्या हद्दीत फटाके जाळण्यास, लाऊडस्पीकरचा वापर करण्यास, घोषणा देण्यास बंदी केली आहे.

हेही वाचाः कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली! ही धोक्याची घंटा तर नाही ना? 4 रुग्णांचा मृत्यू

वरील आदेश गोव्यातील ७ व्या विधानसभा अधिवेशनातील १५ व्या सत्रासाठी जारी करण्यात आला आहे. हा आदेश २८ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून लागू होणार असून तो विधानसभा संपेपर्यंत लागू राहील, असं उत्तर गोवा जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटलं आहे.    

हा व्हिडिओ पहाः Video | Flood effect 2021 | Bardes | बार्देशमध्ये तब्बल ३८ लाख रुपयांचं नुकसान

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!