कोविडबाधितांचे मृत्यू लपवले नाहीत

मदरकेअर इस्पितळाचे संचालक उटगी यांचे स्पष्टीकरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगावः खासगी इस्पितळाकडून मृत्यू लपवण्यात आले, या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर मदरकेअर इस्पितळाचे संचालक सागर उटगी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोविडबाधितांचे मृत्यू लपवल्याच्या वृत्ताचे खंडन केलं.

हेही वाचाः संतोष, रवींकडून आज मंत्र्यांची वैयक्तिक शाळा!

तिन्ही ठिकाणी इस्पितळाकडून माहिती देण्यात आली

इस्पितळाकडून राज्य सरकारला एप्रिलपासून दिलेल्या गुगल शीटवर दिवसातून तीनवेळा कोविड खाटांसह किती रुग्ण आहेत, ऑक्सिजनसाठ्याची माहिती, किती खाटा रिक्त आहेत, किती रुग्ण दाखल झाले आणि कितीजणांचा मृत्यू झाला याची माहिती दिली जात होती. तसंच कोविड काळात रुग्णांना दिलेल्या सेवेचं कौतुक करण्याऐवजी चुकीची माहिती दिली जात आहे. कोविडबाधिताचा मृत्यू झाल्यास सरकारसह मृत्यू प्रमाणपत्रावर व पालिकेकडे अशा तिन्ही ठिकाणी इस्पितळाकडून माहिती देण्यात आलेली आहे. इस्पितळाकडून मृत्यू प्रमाणपत्र न दिल्यास अंत्यसंस्कार कसे केले जातील? अंत्यसंस्कारासाठी त्यावर मृत्यूचे कारण लिहिलं जात होतं, असंही उटगी म्हणाले.

हेही वाचाः बारावीच्या निकालाची गुणपद्धत कशी असावी?

उशीर शक्य, परंतु माहिती लपवली नाही!

आरोग्य संचालनालयाकडून एक एक्सेल शीट पाठवण्यात आली होती. यात खूप किचकट माहिती भरावयाची होती, रुग्णाची सर्व माहिती, त्याच्या कुटुंबीयांची माहिती, तो इस्पितळात आल्याचा दिनांक, किती दिवस उपचार घेतले, कोणते उपचार केले अशी सर्व माहिती द्यावयाची होती. कर्मचारी नसल्याने ती माहिती देण्यात आमच्याकडून उशीर झाला हे आम्ही मान्य करतो. परंतु, मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती दरदिवशी दिली जायची.

हेही वाचाः करोना काळात रजेबाबत सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा

कर्मचार्‍यांची कमी झाल्याने हा उशीर

कोविड रुग्णाचा मृत्यू झाल्यास आणि त्याचे कुटुंबीय गृह विलगीकरणात असल्यास त्या रुग्णाची कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मृत्यू प्रमाणपत्रासाठी पालिकेकडे माहिती पाठवण्यास उशीर झालेला असू शकतो. कारण नावात चूक झाल्यास त्या मृत्यू प्रमाणपत्रातही चूक होऊ शकते, त्यामुळे ही काळजी घेतली जात होती. आमच्याकडून एक्सलशीट देण्यास उशीर झाला. कारण रुग्णांवर उपचार करताना परिचारिका, डॉक्टर आणि प्रशासनातील व्यक्तीही कोविड संसर्गित झाल्याने कर्मचार्‍यांची कमी झाल्याने हा उशीर झालेला आहे.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात आतापर्यंतच्या सर्वाधिक दैनंदिन मृत्यूंची नोंद

राज्य सरकारकडून अजून विचारणा नाही

राज्य सरकारकडून अजून इस्पितळाकडे कोणत्याही प्रकारची विचारणा करण्यात आलेली नाही. सरकारकडून विचारणा झालेलीच नसल्याने कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाह, असं  मदरकेअर इस्पितळाचे संचालक सागर उटगी म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!