पर्यावरण रक्षणार्थ गोवा वन खात्याचं योगदान मोलाचं

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने 2019 पासून गोवा वन खात्याने राबविलेल्या विविध कार्यांचा आढावा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः  दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. पर्यावरणाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी या दिवसाचा महत्त्व आहे. मनुष्य आणि पर्यावरण यांचं दिवस अतूट नातं आहे. निसर्गाशिवाय मनुष्य जीवन शक्य नाही. परंतु माणूस आपल्या स्वार्थासाठी पर्यावरणाला हानी पोहोचवत आहे. वृक्षतोड होतेय, समुद्र-नद्या प्रदूषित केल्या जात आहेत. 1972 पासून जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्राने 1972 पासून 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याचं जाहीर केलं. तेव्हापासून दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो. यानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते शुक्रवारी 4 जूनच्या पूर्वसंध्येला कांपाल उध्यानात व्यावसायिक वृक्षारोपण क्षेत्राची ई-नोंदणी आणि लॉग्सच्या वाहतूकीसाठी ई-पासचा शुभारंभ करण्यात आला. याच दिवसाचं औचित्य साधून गोवा वन खात्याचे 2019 पासूनचे केलेल्या विविध कार्यांचा आढावा देणारा हा लेख.

लोक सहभागाने गोवा हरित

वन आणि झाडांचं आवरण वाढविण्यासाठी लोकांच्या सहभागाने दरवर्षी गोव्यात वृक्षारोपण मोहिमेचं आयोजन केलं जातं. मोकळ्या आणि निकृष्ट वनाची गुणवत्ता तसंच प्रमाण सुधारण्यासाठी अधिकाधिक 240 हेक्टर जमिनीत वनीकरण हाती घेण्यात आलं आहे. तसंच 290 हेक्टर जमिनीत साहाय्यक नैसर्गिक  पुनरूत्थानाचे काम हाती घेण्यात आलं आहे. आंबा, पिंपळ, जांबूळ, भिरंड, आवळा, फणस, टर्मिनालिया, बेर अशाप्रकारची फळझाडे लावण्यात आली आहेत. गवत व्यवस्थापनाबरोबरच जैवविविधतेच्या समृद्धीसाठी तसंच वनक्षेत्रातील वन्य जीवांसाठी अन्न उपलब्ध करण्यासाठी ज्यामुळे त्यांना अन्नाच्या शोधात जंगलातून बाहेर येण्यास भाग पडू नये म्हणून गवतही लावण्यात आलं आहे. याशिवाय हिरवाई सुधारण्यासाठी सदर खात्याने रस्त्याच्या बाजुला, सरकारी जमिनीत आणि शैक्षणिक संस्थेत झाडं लावली आहेत.

वनक्षेत्रात अधिकाधिक 3 लाख रोजगार निर्मिती

नर्सरी, बियाणी संकलन, वृक्षारोपण उपक्रम, जैवविविधतेच्या समृद्धीसाठी तण काढून टाकणे, माती आणि आर्द्रता संवर्धनाची कामं, सामाजिक वनीकरण आणि वन्यजीव व्यवस्थापनासंबंधित कामांद्वारे सदर खात्याने वन तथा वनाबाहेर राहणाऱ्या स्थानिक युवकांसाठी 3 लाख रोजगाराची निर्मिती केली.

वन्य प्राण्यांच्या हल्यात मृत्यू झाल्यास 10 लाख रूपये नुकसान भरपाई

राज्यात वन्यजिवांचे हल्ले सातत्याने होत असतात. सरकारने याबाबत धोरणात सुधारणा करत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्याचा मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला. वन्य प्राण्यांच्या हल्यात मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याला 10 लाख रूपये नुकसान भरपाई दिली जाते.

वन महोत्सव आणि सुमारे 5 लाख रोपाचे लोकांना मोफत वितरण

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पारंपरिकदृष्ट्या वनमहोत्सवाचं आठवडाभर आयोजन करण्यात येतं. तथापि गोव्यात सुमारे 3 महिने वनमहोत्सव साजरा करण्यात येतो आणि या महोत्सवाला जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरवात होते. या तीन महिन्याच्या कालावधीत वन आणि वनाच्या बाहेर वृक्षारोपणाची मोहिम हाती घेतली जाते. राज्यातील सर्व लोक या वृक्षारोपण मोहिमेत मोठ्या उत्साहाने सक्रीय सहभागी होतात. लोकांना वृक्षारोपणास प्रवृत करण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी सुमारे 5 लाख औषधी वनस्पती, शोभेची झाडे सागवान, काजू अशा प्रकारची व्यावसायिक झाडे मोफत वितरीत केली जातात.

व्यावसायिक वृक्ष लागवडीसाठी नोंदणीकृत व्यावसायिक वृक्ष लागवडीला गोवा वृक्षारोपण कायदा 1984 तून वगळण्यात आले आहे.

वृक्षारोपण सुलभ करण्यासाठी सरकारने नोंदणीकृत नवीन व्यावसायिक वृक्षारोपण क्षेत्र आणि खाजगी बिगर वनांच्या जमिनीवर लागवडीतील सर्व झाडे कायद्याच्या तरतुदीपासून वगळण्यात आली आहेत. या लोकाभिमुख धोरणाच्या निर्णयामुळे आर्थिक फायद्यासाठी व्यावसायिक वृक्षारोपण हाती घेण्यात शेतकऱ्यांना तसंच इतर जमीनदारांना प्रोत्साहन मिळेल. सरकारने स्वंयपूर्ण गोवा आणि आत्मनिर्भर भारतच्यादृष्टीने व व्यवसाय करण्यासाठी घेतलेलं हे अजून एक पाऊल आहे. शेतजमिनीत किंवा इतर खाजगी जमिनीत व्यावसायिक वृक्षलागवड केल्याने लाकूड आधारित उध्योगांना कच्चा मालाचा निरंतर पुरवठा, शेतकऱ्यांसाठी आणि स्थानिक लोकांसाठी अतिरिक्त उत्पन्न, लाकूड संबंधित उत्पादनामध्ये स्वंयंपूर्णता असे अनेक फायदे उपलब्ध होतात. वृक्ष उत्पादक गोव्यात किंवा गोव्याबाहेर कोणत्याही ठिकाणी लाकूड विकू शकतात किंवा वाहतूक करू शकतात.

खाणींच्या ढिगाऱ्यांसह निकृष्ट जमिनीची सुधारणा

खाण डंप क्षेत्रासह निष्कृष्ट जमिनीची सुधारणा करणं हा वन खात्याच्या एक मुख्य उद्देश आहे. यानुसार नेत्रावळी वन्यजीव अभयारण्यात खाण डंप क्षेत्रात सुमारे 28 हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली आहे. झाडांची प्रजाती आणि वृक्षारोपण तंत्राची काळजीपूर्वक निवड केल्याने वृक्षारोपण फार चांगल्या स्थितीत आहे आणि निष्कृष्ट जमिनीच्या सुधारणेसाठी व जैवविविधता पुर्नसंचयित करण्याचे खात्याचे प्रयत्न चालू आहेत.

300 हून अधिक जलस्त्रोताची निर्मिती

जल संवर्धन, भूजल पुनर्भरणा, जंगलातील सर्व भागात वर्षभर वन्यजीवांसाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी खात्याने जलस्त्रोताची निर्मिती केली आहे. गेल्या दोन वर्षात 300 हून अधिक जलस्त्रोताची निर्मिती करण्यात आली आहे.

वन्य प्राण्यांच्या बचावासाठी 24 तास समर्पित वन्यजीव बचाव पथक कार्यरत

तणावाखालील वन्य प्राण्यांची सुटका करण्यासाठी तसंच मनुष्य-प्राण्यांच्या संघर्षाला तोंड देण्यासाठी वन खात्याने कांपाल, मडगाव आणि खोतीगाव येथे बचाव पथकांची नियुक्ती केली आहे. किंग कोब्रा, बिबट्या, गौर, सिव्हेर मांजर अशा सुमारे 1500 वन्यप्राण्यांना यशस्वीरीत्या वाचविण्यात आलं असून नंतर त्यांना जंगलात सोडण्यात आलं.

निसर्ग मार्गदर्शक म्हणून 268 स्थानिक युवकांना प्रशिक्षण

निसर्ग शिक्षणासाठी तसंच वनाचं जतन आणि सरंक्षण यासंबंधी जागृती निर्माण करणं आणि सामुहिक सहभागामार्फत खारफुटी इकोसिस्टमचे महत्व यासाठी वन खात्याने निसर्ग मार्गदर्शक म्हणून वनाबाहेर आणि वन भागात राहणाऱ्या सुमारे 268 स्थानिक युवकांना प्रशिक्षण दिलं आहे. क्षमता वाढविण्यासाठी आणि विशिष्ठ क्षेत्रातील प्रशिक्षित निसर्ग मार्गदर्शकांना प्रशिक्षण देण्याचं वन खात्याचं नियोजन आहे.

लोक सहभागाने जैवविविधतेच्या संरक्षणासाठी मोले येथील जैवविविधता उध्यान विकसीत

गोव्याच्या 60 व्या मुक्तीच्यावर्षी मौल्यवान जैवविविधतेच्या संरक्षणासाठी जैवविविधता उध्यान विकसीत करण्यात आलं आणि आपल्या दैनंदिन जीवनात जैवविविधतेचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती करण्यात आली. उध्यानातील बहुतेक काम नोंदणीकृत स्थानिक स्वंय मदत गटाव्दारे केलं जाईल. या प्रयत्नांमुळे सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि स्वंयपूर्ण गोवा अभियान मजबूत होण्यास आणि स्थानिक लोकांना त्यांच्या दारापर्यंत रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मदत होईल.

दर्जेदार रोपांची लागवड करण्यासाठी आधुनिक नर्सरीचा विकास

राज्यभरातील 23 वन नर्सरीव्दारे वनभागात तसंच लोकांना मोफत रोपे वितरीत करण्यासाठी व दर्जेदार रोपांची लागवड करण्यासाठी आधुनिक नर्सरीचा विकास करण्यात आला आहे. सदर खाते वर्षानुवर्षे नर्सरी पायाभूत सुविधा आणि उपकरणांचा दर्जा वाढविण्यासाठी व विकसीत करण्यासाठी सतत प्रसत्न करीत आहे.

इको-पर्यटनास प्रोत्साहन

स्थानिक लोकांना सहभागी करून, स्थानिकांना निसर्ग मार्गदर्शक प्रशिक्षण, बोंडला, मोले, नेत्रावळी आणि खोतीगांव वन्यजीव अभयारण्यात इको-पर्यटन सुविधा निर्माण करून राज्यात ईको-पर्यटनास प्रोत्साहन देण्याचा सदर खात्याचा हेतू आहे.

साखळीत ग्राम उपवनाची निर्मिती

10 एप्रिल 2021 रोजी साखळी येथील ग्राम उपवनात मुख्यमंत्र्यांनी वृक्षारोपण केलं. राज्य पक्षी महोत्सव, वन अन्न महोत्सव, कासव संवर्धन महोत्सव, फॉरेस्ट फन डे आणि बर्ड वॉल्क्स यासारखे खास कार्यक्रम केवळ गोव्यासाठी आयोजित करण्यात आले आहेत.

तसंच पारंपरिक औषधी ज्ञानासाठी 50 वैध्य मित्रांची नोंदणी करण्यात आलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!