काँग्रेस पक्षाने वाहिली आयरीन बार्रोस यांना श्रद्धांजली

बेतालभाटी येथील निवासस्थानी दिली भेट

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगावः काँग्रेस पक्षातर्फे मंगळवारी गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या माजी अध्यक्ष आयरीन बार्रोस यांना त्यांच्या बेतालभाटी येथील निवासस्थानी श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवंगत आयरीन बार्रोस यांचे सुपुत्र दिनार बार्रोस यांच्याकडे सर्व काँग्रेस नेत्यांनी सहवेदना व्यक्त केल्या.

हेही वाचाः सूचना मिळेपर्यंत काबूल विमानतळावर येऊ नका!

काँग्रेसचा झेंडा लपेटून पक्षासाठी दिलेल्या योगदानाबद्दल दिली मानवंदना

काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश राव, निरीक्षक प्रकाश राठोड, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी आयरीन बार्रोस यांच्या पार्थिवावर काँग्रेसचा झेंडा लपेटून पक्षासाठी त्यानी दिलेल्या योगदानाबद्दल मानवंदना दिली.

काँग्रेस नेत्यांची उपस्थिती

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष एम के शेख, आल्तिनो गोम्स, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष ज्यो डायस, नुवे गट अध्यक्ष मान्युएल डिकोस्ता, माजी मंत्री मिकी पाशेको, काँग्रेस नेते युरी आलेमाव आणि जोस राजू काब्राल, कुंकळ्ळी गट अध्यक्ष आसिस नोरोन्हा, दिपक खरंगटे व इतर उपस्थित होते.

हेही वाचाः वास्को, डिचोलीपाठोपाठ फोंड्यालाही डेंग्यूचा विळखा

काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश राव, गोवा प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, उपाध्यक्ष आल्तिनो गोम्स व एम के शेख यांची यावेळी आयरीन बार्रोस यांच्या कार्याचा गौरव करणारी आणि त्यांना श्रद्धांजली वाहणारी भाषणं झाली.

हा व्हिडिओ पहाः Crime | Follow Up | Major Development | सिद्धी नाईकच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाची अपडेट

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!