‘अभंग गंगेच्या काठावर’ मैफलीला रसिकांकडून भरभरून दाद

श्री क्षेत्र फातर्पा येथील शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानात दुसऱ्या श्रावणी रविवारानिमित्त मैफिलीचं आयोजन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र फातर्पा येथील शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानात तिर्थरुप संतांच्या ‘अभंग गंगेच्या काठावर’ मैफलीने रसिकांना दिर्घकाळ रिझवलं. दुसरा श्रावणी रविवार उत्सवानिमित्त या बहारदार मैफलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

हेही वाचाः तरूणांनो सावधान! नोकरभरतीबाबत सतर्क रहा

रसिकांकडून भरभरून दाद

या मैफलीला तबलापटू तथा संगीतकार यतीन तळावलीकर यांनी कार्यक्रमाच्या शेवटी स्वत: संगीतबद्ध केलेली श्री रुपेश शंभू देसाई यांची भक्तिपूर्ण रचना ‘श्री शांतादुर्गे कुंकळ्ळीकरीणी तूच माझ्या ध्यानी मनी’ सादर केली. या गीताला जाणकार रसिकांनी भरभरून दाद दिली.

हेही वाचाः उपअधिक्षक पदे थेट भरती प्रकरणी 30 रोजी सुनावणी

देवस्थान समितीने सर्वांना उपलब्ध करून दिले मास्क

कोविड महामारीमुळे भयभीत झालेलं वातावरण देवी शांतादुर्गेच्या कृपेने दूर व्हावं आणि मंदिरात सामुदायिक नामस्मरण सतत सुरू रहावं अशी मागणी संस्थानचे अध्यक्ष नितीन देसाई यांनी केली. त्यांच्या समितीच्या यशस्वी आणि धाडसी निर्णयाने सरकारने घातलेल्या नियम अटींचं पालन करुन हा उत्सव संपन्न झाला. यावेळी समितीने सर्वांना मास्क उपलब्ध करुन दिले.

भक्तांकडून देवीचं दर्शन

देवीच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भक्तांनी मोठ्या श्रद्धेने देवीचं दर्शन घेतलं तसंच पालखी सोहळ्याचा लाभ घेतला. काही सांकृतिक कलाप्रेमी रसिकांनी आपली बैठक अगोदरच घेतली होती. त्यांना मुंबईतील प्रसिद्ध गायिका पं. अरुण कशाळकर आणि डॉ.शैला पेठे ओक यांच्या शिष्य नेहा काळे नेने आणि गोमंतकीय गायक नरसिंह साने यांनी एका पेक्षा एक भाव गीत, भक्ती गीत नाट्यगीतांनी तृप्त केलं.

हेही वाचाः सिद्धी नाईक प्रकरणः 5 पैकी कोणत्या बसमधून सिद्धीने केला प्रवास?

या मैफलीची संगीत संयोजाची बाजू विष्णू शिरोडकर (सिंथेसायझर), यतीन तळावलीकर (निर्मिती संकल्पना प्रमुख तथा तबला वादक), धनराज मडकईकर (संवादिनी), पवन वळवईकर (पखवाज), प्रदीप पंडित (निवेदक), रुद्रेश फोंडेकर (ध्वनिसंकल्पना) आणि गोमंतकीय उदयोन्मुख बाल कलाकार स्मीत नाईक यांनी तालवाद्यावर अफलातून साथसंगत केली.

हा व्हिडिओ पहाः CRIME | CANDLE MARCH | फोंड्यात विद्यार्थी संघटनांतर्फे मेणबत्ती मोर्चा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!