गोवा शिक्षण मंडळाने काढलेल्या परिपत्रकात क्रीडा सवलतीच्या गुणांचा उल्लेख नाही

हायस्कूल्सना गोवा शिक्षण मंडळाकडून दहावीचे निकाल तयार करण्याचे निर्देश; जारी केलं परिपत्रक

यश सावर्डेकर | प्रतिनिधी

सावर्डेः 2021च्या दहावीच्या परीक्षा गोवा शिक्षण मंडळाने रद्द केला असून दहावीच्या परीक्षेचा निकाल ठरवण्यासाठी गोवा शिक्षण मंडळाने सर्व हायस्कूल्सला एक परिपत्रक पाठवलं आहे. परिपत्रकात दहावीचा निकाल तयार करताना कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना गुण द्यावेत याबद्दल सूचना देण्यात आल्यात. तरी सदर परिपत्रकात क्रीडा सवलतीच्या गुणांचा कुठेच उल्लेख नसल्यानं अनेक क्रीडापटूंची निराशा झाली आहे. त्यामुळे सरकार आणि गोवा शिक्षण मंडळाने सदर परिपत्रकात क्रीडा सवलतीच्या गुणांचा समावेश करून क्रीडापटूंना न्याय द्यावा, अशी मागणी गोव्यातील क्रीडापटूंकडून होतेय.

हेही वाचाः करोनावरील उपचारांसाठी इव्हर्मेक्टिन, डॉक्सिसाईक्लिन औषधांचा वापर थांबवा

गोवा शिक्षण मंडळाकडून परिपत्रक जारी

कोविडमुळे जगभरात गेल्या वर्षभरापासून सर्व व्यवहार ठप्प झालेत. 20-21 या वर्षात हायस्कूल कॉलेजेस बंद होते. विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाइन झालं. सर्व निर्बंध लावूनही अखेर कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. त्यामुळे गोवा शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. तसंच इंटर्नल गुणांच्या आधारे दहावीचा निकाल तयार करणार असल्याचं सांगितलं. आता दहावीचा निकाल तयार करण्यासाठी गोवा शिक्षण मंडळाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलंय.

निकालात क्रीडा गुणांचा समावेश करा

गोव्यात शिक्षण घेताना अनेक विद्यार्थी क्रीडा उपक्रमांतूनही भाग घेतात. सरकारकडूनही या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातून पुढे सरण्यासाठी प्रोत्साहन द्यायला म्हणून अनेक राष्ट्रीय स्पर्धा तसंच दहावीच्या परीक्षेत सवलतीचे गुण देण्याची तरतूद हे. जरी यंदा गोवा सरकारकडून दहावीच्या परीक्षा रद्द केल्या गेल्या असल्या तरी दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी काढलेल्या परिपत्रकात क्रीडा सवलतीच्या गुणांचा उल्लेख कुठेच नाही. त्यामुळे सरकार तसंच गोवा शिक्षण मंडळाने क्रीडा क्षेत्रात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण द्यावेत, अशी मागणी पालकांनी शाळांकडे संपर्क साधून केली आहे. यंदा जरी स्पर्धा झाल्या नसल्या तरी 2019-20 वर्षाचा राष्ट्रीय तसंच इतर स्पर्धा पार पडल्या होत्या. त्यामुळे त्या स्पर्धा ग्राह्य धरून निकालात क्रीडा सवलतीच्या गुणांचा समावेश करावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!