नार्वे तीर्थावर सपत्नीक मुख्यमंत्र्यांनी केली पूजा

ट्विट करत दिली माहिती; गोंयकारांसाठी केली प्रार्थना

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोकुळाष्टमीचा सण श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सृष्टीचा पालनकर्ता विष्णूने या दिवशी आपल्या आठव्या अवतारात श्रीकृष्णाच्या रूपात जन्म घेतला, असं पुराण सांगतं. भारताच्या अनेक भागात हा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो. राज्यातही या दिवशी प्रचंड उत्साह दिसून येतो. आज गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नार्वे तीर्थक्षेत्रावर पूजा आणि अभिषेक करून आशीर्वाद घेतले.

देवींच्या पालखीचं दर्शन घेतलं

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दरवर्षी डिचोली, नार्वे, पिळगाव या गावातील देवींची पालखी नार्वे तीर्थक्षेत्रावर येतं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्या पालखीचं दर्शनही घेतलं. यावेळी नार्वे ग्रामस्थांनी परिसरातील पारंपरिक वाटेची समस्या मुख्यमंत्र्यांना सांगितली. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर समस्या सोडवण्याचं आश्वासन स्थानिकांना दिलं.

भगवान श्रीकृष्ण सर्वांना चांगलं आरोग्य, आनंद आणि समृद्धी देवो

मुख्यमंत्र्यांनी नार्वे तीर्थक्षेत्रावर केलेल्या गोकुळाष्टमीच्या या पुजेविषयी ट्विट करत माहिती दिलीये. ट्विट करताना मुख्यमंत्री म्हणालेत, कृष्ण जन्माष्टमीच्या या शुभ मुहूर्तावर आज नार्वे येथील तीर्थ स्थानावर भगवान श्रीकृष्णाची आम्ही विशेष प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य, आनंद आणि समृद्धी देवो.

हा व्हिडिओ पहाः Mopa link road aquisition| मोपा लिंक रोड भूसंपादन लोकांच्या मुळावर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!