मुख्यमंत्र्यांनी घेतली उस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक

मडगाव येथे बैठकीचं आयोजन; ऊस उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक कृती करणार असल्याचं दिलं आश्वासन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दक्षिण गोव्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली. शेतकऱ्यांना पेमेंट सेटलमेंट आणि इतर समस्यांच्या संदर्भातील ऊस उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक कृती करेल असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलं.

हेही वाचाः बिगर गोमंतकीयांची बोगस नावं मतदार यादीतून काढण्यासाठी आरजी मोहीम राबवणार

संजीवनी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारला सहकार्य करा

माथानी साल्ढाणा प्रकल्पात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पेमेंट दराबाबत सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशातील इतर राज्यांच्या तुलनेत खूप जास्त असल्याची माहिती दिली. सरकारने अधिसूचित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांनी शेतकऱ्यांना संजीवनी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारला सहकार्य करण्याचं यावेळी आवाहन केलं.

कृषीमंत्री तथा उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी बैठकीत शेतकऱ्यांना सरकारला सहकार्य करण्याचं आणि सामंजस्याने तोडगा काढण्याचं आवाहन केलं. सरकारने स्थापन केलेल्या ऊस उत्पादक समितीचे अध्यक्ष एड. नरेंद्र सावईकर, कृषी संचालक नेविल अल्फोन्सो आणि इतर मान्यवरांनी यावेळी बैठकीस उपस्थित लावली.

हा व्हिडिओ पहाः Video | Sattari Landslide | जंगल तोडून अतिक्रमण केल्यामुळे डोंगर कोसळला?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!