भाजप सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळतंय

Goan Varta Live | प्रतिनिधी
मडगावः भाजप सरकार सामान्य लोकांना संकटात टाकून केवळ धनाड्यांना मदत करण्याचं धोरण राबवत आहे. मोदींच्या क्रोनी क्लबच्या घशात इंटरनेट सेवेचं कंत्राट घालण्यासाठीच गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे खेळ मांडला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या प्रवक्त्या पल्लवी भगत यांनी केला आहे.
हेही वाचाः नारायण दत्ता नाईक यांच्यावर जीवघेणा हल्ला
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गांपासून वंचित रहावं लागतंय
गोव्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना नेटवर्क सुविधा उपलब्ध नसल्यानं ऑनलाईन वर्गांपासून वंचित रहावं लागत आहे. कोविड महामारी सुरू होऊन दिड वर्षं झालं तरी भाजप सरकारने अजुनही शैक्षणिक कृती आराखडा तयार केलेला नाही. गेल्या वर्षीच इंटरनेट नेटवर्कची समस्या ऐरणीवर आली होती. परंतु बेजबाबदार भाजप सरकारने त्यावर उपाययोजना केली नाही. त्यामुळेच आता विद्यार्थी, शिक्षक तसंच पालक यांना नाहक त्रास आणि कष्ट सहन करावे लागत आहेत.
हेही वाचाः ‘ईडी’नं जप्त केली अभिनेता डिनो मोरियाची संपत्ती ; मनी लॉण्ड्रिंगचा आरोप
सरकारने जाणिवपूर्वक त्यावर ठोस उपाययोजना केली नाही
विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी गोव्याला भेट दिलेली इंट्रानेट ऑप्टिक फायबर सेवा पूर्ण क्षमतेने कार्यांवित करण्याची मागणी केली होती. गोव्यातील प्रत्येक पंचायतीच्या दारात पोचलेली ही सेवा सरकारने योग्य प्रकारे हाताळल्यास इंटरनेटचा प्रश्न कायमचा सुटणार असं वारंवार भाजप सरकारला दिगंबर कामत यांनी सांगुनही सरकारने जाणिवपूर्वक त्यावर ठोस उपाययोजना केली नाही, असं भगत यांनी म्हटलंय.
हेही वाचाः डिजिटल मीटर, जीपीएससाठी अंतिम मुदत
इट्रानेटचे जाळे विस्तारल्यास संपूर्ण गोव्याचा प्रश्न सुटणार
गोव्यात उपलब्ध असलेले इट्रानेटचे गोवा ब्रॉडबेंडचे जाळे आज सरकारी कार्यालये, अनेक स्थानिक टीव्ही चॅनल यांना अखंडितपणे सेवा देत असुन, सरकारने हे जाळे विस्तारल्यास संपूर्ण गोव्याचा प्रश्न सुटणार असल्याचा दावा भगत यांनी केलाय.
हेही वाचाः आता वाहन चालवण्यासाठी आवश्यक शिकाऊ परवाना मिळणार ऑनलाईन
मोदींच्या अंबानी-अदानीना संपूर्ण गोव्याची इंटरनेट सेवा बहाल करण्याचा सरकारचा डाव
भाजप सरकारला उपलब्ध असलेल्या नेटवर्कचा विस्तार करायचा नसुन, मोदींच्या क्रोनी क्लबच्या घशात गोव्यातील इंटरनेट सेवा घालण्यासाठीच सरकार मुद्दामहून इंट्रानेटचा विस्तार रोखत आहे. आज सरकारच्या संगनमतानेच अनेक ठिकाणी गोवा ब्रॉडबॅंड सेवेचे केबल कापुन ,या नेटवर्क सेवेला अपशकुन करण्याचा प्रयत्न होत आहे. भाजप सरकारने जसं बीएसएनएलचं जाळं जाणीवपूर्वक उध्वस्त केलं तसंच इंट्रानेटचं जाळं नश्ट करुन मोदींच्या अंबानी-अदानीना संपूर्ण गोव्याची इंटरनेट सेवा बहाल करण्याचा भाजप सरकारचा डाव आहे, असा आरोप भगत यांनी केला आहे.
हेही वाचाः कोरोना ? छे…साधं सर्दी-पडसं ; ‘या’ देशात आता नवे नियम !
भाजपच्या भांडवलशाही धोरणानं गोव्यातील विद्यार्थ्यांना नाहक त्रास
भाजपच्या भांडवलशाही धोरणानं आज गोव्यातील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावे लागत आहेत. सरकारच्या नाकर्तेपणाने विद्यार्थ्यांचं भवितव्यच धोक्यात आलं आहे. सरकारने ताबडतोब इंट्रानेट सुविधा कार्यांवित करावी आणि त्यांचं थेट कनेक्शन सर्व शाळांना द्यावं, अशी मागणी भगत यांनी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत केवळ कमिशन खाण्यासाठीच गोव्यात मोबाईल टॉवर घालण्यावर लक्ष केंद्रित करत असून, उपलब्ध असलेल्या ब्रॉडबॅंड सेवेकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोपही भगत यांनी केलाय.