भाजप सरकार म्हणजे दुर्गंधी युक्त कचरा यार्ड

काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. श्रीनिवास खलप यांची टीका; मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोव्यातील भाजप सरकार म्हणजे दुर्गंधीयुक्त कचरा यार्ड बनलंय. उच्च न्यायालयाकडून या सरकारला वेगवेगळ्या विषयांवर सातत्याने चपराक बसत असून, बेजबाबदार आणि अकार्यक्षम डॉ. प्रमोद सावंत यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा देणं गरजेचे आहे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. श्रीनिवास खलप यांनी केलीये. सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मलनिस्सारण महामंडळाकडून पणजीत उघड्यावर सोडण्यात आलेल्या सांडपाण्याबद्दल सरकारची चांगलीच कान उघाडणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रवक्त्याने वरील मागणी केली आहे.

हेही वाचाः डिसोझांना टीटोज न विकण्याची विनंती करेन

‘तुमच्याकडे आणखी काम नाही का?’

आपल्या आदेशात, सदर घाण उघड्यावर सोडणं बंद करण्याचं सोडून, भाजप सरकारने २०१२ ते २०२१ पर्यंत सदर प्रकार उघडकीस आणणाऱ्या तक्रारदारा विरूद्ध कारवाईचा ससेमीरा लावला. त्यावर भाजप सरकारला ‘तुमच्याकडे आणखी काम नाही का?’ असा प्रश्न विचारुन उच्च न्यायालयाने भ्रष्ट भाजप सरकारचे कान पिळले, असा टोला ॲड. श्रीनिवास खलप यांनी हाणला आहे.

हेही वाचाः अवघ्या 100 रुपयांसाठी माजी कुलगुरूंची हत्या !

उच्च न्यायालयाकडून भाजप सरकारला भानावर येण्याचा सल्ला

सरकारला आपल्या गलथान कारभारा विरूद्ध बोलणाऱ्यांच्या आड गुन्हे दाखल करण्याची सवय झाली आहे का? असा प्रश्न खलपांनी विचारलाय. जनहिताच्या नजरेने तक्रार दाखल करुन न्याय मागणाऱ्यांना सरकारने मदत करणं गरजेचं आहे, असं सांगून उच्च न्यायालयाने भाजप सरकारला भानावर येण्याचा सल्ला दिलाय. एका स्टाफ नर्सच्या मागे दक्षता विभागाच्या चौकशीचा ससेमीरा लावण्याऐवजी सरकारने लोक हितासाठी वरील प्रकार बंद करणं महत्त्वाचं होतं, हे सरकारला सुनावले हे बरं झालं, असं ॲड. खलप यांनी म्हटलंय.

हेही वाचाः मतदारांच्या गरजा ओळखून विकास करतो तोच खरा आमदार

भाजपकडून सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग

उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणातून भाजप सरकारचं सुडाचं राजकारण परत एकदा समोर आले असुन, सरकारच्या नाकर्तेपणाविरूद्ध बोलणाऱ्यांची बोलती बंद करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग भाजप सरकार करत असल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय, असा दावा ॲड. खलपांनी केलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!