ऑक्सिजन मृत्यूच्या मुद्द्यावर भाजप सरकार स्वतःच्याच खोट्या जाळ्यात अडकलं

राहुल म्हांबरेः राणे आणि भाजप सरकारचा यू-टर्न अविश्वसनीय म्हणत केली टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः आम आदमी पक्षाने (आप) गुरुवारी भाजप सरकारवर आणि विशेषत: आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी विधानसभेत “ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणताही मृत्यू झाला नाही” असे खोटे वक्तव्य केल्याबद्दल टीका केली. ‘आप’चे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी निदर्शनास आणून दिलं की, हे कोरोना योद्ध्यांना निराश करेल. ऑक्सिजन-मृत्यूंची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन आयोगाची मागणी सरकारने जनहित याचिकेत नाकारली होती, असंही म्हांबरे म्हणाले.

हेही वाचाः गोवा श्रमिक पत्रकार संघटनेतर्फे ‘गूज पत्रकार’ पुरस्कारांची घोषणा

आरोग्यमंत्र्यांचं वक्तव्य सरकारला उघडं पाडतं

आरोग्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेलं वक्तव्य भाजप सरकारला उघड करतं. या वक्तव्यामुळे भाजप सरकार स्वतःच्या खोटेपणाच्या जाळ्यात अडकले आहेत. भाजप सरकार केवळ स्वतःचं अपयश लपवत होतं आणि हा प्रकार कोरोना लढवय्यांना दोषी ठरवू शकतो, असं म्हांबरे म्हणाले.

हेही वाचाः भाजप सरकार गोंयकरांना भेडसावणाऱ्या समस्यांसाठी चिंतित नाहीत

राणे आणि भाजप सरकारचा यू-टर्न अविश्वसनीय

हे तेच विश्वजीत राणे आहेत का, ज्यांनी 11 मे रोजी जीएमसीमध्ये ऑक्सिजनशी संबंधित मृत्यूंसाठी उच्च न्यायालयात चौकशी करण्याची मागणी केली होती, असा सवाल म्हांबरेंनी केलाय. राणे आणि भाजप सरकारचा यू-टर्न अविश्वसनीय आहे. राणे यांनी स्वतः हा मुद्दा उपस्थित केला होता आणि मुख्यमंत्र्यांनी हेदेखील कबूल केलं होतं, की जीएमसीमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची उपलब्धता नसणं ही रुग्णांसाठी काही समस्या निर्माण करू शकते. सर्वांना रात्री उशिरापर्यंत चलालेली भाजप कोर कमिटिची बैठक आठवते, जिथे ऑक्सिजन पुरवठ्याच्या समस्येवर लक्ष ठेवण्यासाठी 3 सदस्यीय समितीची घोषणा करण्यात आली, असं म्हांबरे म्हणाले.

हेही वाचाः तिलारी धरणाचे दरवाजे उघडले ही अफवाः कोरगांवकर

ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूच्या कुटुंबीयांची माफी मागणं आणि त्यांना नुकसानभरपाई देणं बाकी आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूच्या मुद्द्यावरून राज्यसभेत असाच नकार जारी करणाऱ्या केंद्र सरकारकडून, राज्य सरकारवर दबाव आणल्याचा आरोप म्हांबरे यांनी केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!