घातापाताचा मोठा कट उधळला ; कोलकाता इथं 3 दहशतवादी जेरबंद

कोलकाता पोलिसांच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) केली कारवाई

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोलकाता पोलिसांच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) आज (रविवार) तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करत घातापाताचा मोठा कट उधळला. हे तिन्ही दहशतवादी जमात-उल-मुजाहिदीन बांग्लादेशचे सदस्य असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

या तिघांनाही एसटीएफने आज दुपारी दक्षिण कोलकातामधील हरिदेवपूर भागातून अटक केली. पोलिसांनी सांगितले की, कोलकाता पोलिसांच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) या तिघांना पकडले. जेएमबी या संघटनेचे हे तिन्ही संशयित दहशतवादी काही महिन्यांपासून भाडेतत्वार खोली करून राहत होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर या तिघांना अटक करण्यात आली.

तर, ”आम्हाला जिहादी साहित्य सापडले आहे आणि त्यांच्या फेसबुक खात्यांची तपासणी केली गेली आहे. याशिवाय महत्त्वाच्या जेएमबी सदस्यांची नावे आणि फोन नंबर्स असलेली हस्तलिखित डायरी आढळली. चौकशी सुरू केली आहे. आम्ही हे उद्या कोर्टासमोर मांडू.” असे कोलकाता पोलीस एसटीएफचे अतिरिक्त आयुक्त व्ही. सोलोमन नेसाकुमार यांनी सांगितले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!